Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

शिरपूर पोलिसांची कारवाई,राहुल भोई खूनप्रकरणातील आरोपींना नेले घटनास्थळी नागरिकांची झाली होती मोठी गर्दी....



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहरातील खंडोबा महाराज यात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला राहुल राजू भोई (२२) तरुणाचा भर चौकात निर्घृण खून केल्याची घटना घडली होती.आतापर्यंत या घटनेतील ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.एक अल्पवयीन बालसुधारगृहात तर एक रुग्णालयात उपचार घेत आहे.उर्वरित ५ जणांना शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी नेले होते.

शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास राहुल राजू भोई (२२) रा. महात्मा फुले नगर शिंगावे याचा खून करण्यात आला होता.याप्रकरणी त्याचे वडील राजू गुलाब भोई यांनी

दिलेल्या तक्रारीनुसार गणेश उर्फ भट्या सुभाष जगताप पाटील (३०) रा. बालाजी नगर, बंटी पाटील (२१), विकी दत्तू पाटील (२०), दीपक धोबी (२३), पकडले होते. हरिओम सिंग (२०), कोहिनूर राजपूत (२२), विधीसंघर्षीत बालक यांच्यासह इतरांविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवशीच मुख्य आरोपी तथा एलसीबी पथकाचा खबऱ्या गणेश उर्फ भट्या पाटील व बंटी पाटील या दोघांना धुळे एलसीबीच्या पथकाने धुळ्यातील अवधान परिसरात पकडले होते. त्यानंतर कोहिनूर राजपूत (२२) यास ताब्यात घेतले होते. घटनेच्या दसऱ्या दिवशी नाशिक येथून हरिओम सिंग (२०) रा. जैन हॉस्टेल करवंद नाका शिरपूर व विधीसंघर्षीत बालक असे दोघांना

मंगळवारी पुन्हा विकी दत्तू पाटील (२०) व दीपक धोबी (२३) या दोघांना मोबाईल लोकेशनवरून धुळे येथून ताब्यात घेतले. वरील आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

सदर संशयितांना परिसरात दहशत निर्माण केलेली होती.यामुळे ताब्यात असलेले ५ संशयितांना क्रांतीनगर परिसरात पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले होते.यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध