Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी मंजुरी कामांमध्ये साक्री चा गटविकास अधिकाऱ्यांचा अक्षम्य अलगर्जीपणा



साक्री तालुक्यातील आदिवासी दलित,शोषित,पिढीत अशा सर्व प्रकारच्या बहुजन बांधवां चा सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र शासन रोजगार हमी योजने अंतर्गत शेती सिंचन  विहिरी करिता सिंचन विहिरी देण्याचे प्रावधान आहे.या योजनेअंतर्गत आदिवासी दलित बहुजन बांधवांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत परंतु त्यांना राज्य स्तरावर ३ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे त्याकरिता अनुदान देखील मंजूर झाले आहेत
 परंतु आजमितीस ३ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन देखील शेतकरी मंजूर हे विहिरीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समिती साक्री कार्यालयात आवारात रोज शेकडो शेतकरी,मजूर सिंचन विहिरीच्या मंजुरीसाठी किंवा कामासाठी खेटे मारत आहे. साक्री चा गट विकास अधिकारी कडून नेहमी उडवा उडवीची उत्तरे मिळतात ती अशी कधी ग्रॅंड नाही कधी आचारसंहिता / निवडणुका सुरू आहेत  साहेबांची बदली झाली आहे किंवा होणार आहे. अशी उत्तरे देण्यात येतात, पुढील महिन्यात या असे भ्रामक खोटे उत्तर दिले जात आहेत. याचा अर्थ गरीब शेतकऱ्यांची हेतुपुरस्कर  पिळवनुक केली जात आहे सिंचन विहिरीचा अनेंक जाचक अटी आहे त्यादेखील शिथील करने गरजेचे आहे सिंचन विहीर वाटप कधी होणार ? एखाद्या गरीब शेतकऱ्याने सिंचन विहीर मिळवण्याकरता आत्महत्या करावी का ? असे अनेक निर्णय प्रश्न उपस्थित राहत आहेत गरीब शेतकऱ्याच्या जीवन मरणाच्या समस्या बाबत शासनाचा निधी अडवण्याचा आपणास अधिकार आहे का ? कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व  प्रकारच्या सहकारी संस्थांच्या मार्च मध्ये २० हजार ६३८   निवडणुका होणार आहेत .परत आचारसंहिता लागली म्हणून आपण सिंचन विहिरींचे आदेश देणार नाहीत.आपण तालुक्यातील जनतेसाठी लोकसेवक असून आपल्या कर्तव्याचा व अधिकाराचा दुरुपयोग करीत आहे असे वाटत आहे असे एक ना एक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेले आहेत तरी शासनाचा मागेल त्याला विहीर या सिंचन विहिरी लाभार्थींना वाटपातील अक्षम्य दिरंगाई बाबत दोन दिवसात स्वयंमस्पष्ट खुलासा द्यावा.  अन्य:था मुदतीत आपण खुलासा /माहिती न दिल्यास आम्ही अमरण उपोषण किंवा जन आंदोलन उभे करणार आहोत याची गंभीर्यपूर्व दखल घ्यावी केवळ आपलं पद शाबूत राखण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी आपण साखरी तालुक्यातील लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित नाही ठेवू शकत कारण गेल्या दोन ते तीन वर्षापासून शासनाची कुठलीही योजना आपण कार्यान्वित केलेली नाही यामुळे आपल्याविषयी लोकांच्या मनात तीव्र नाराजी आहे हे स्पष्ट दिसून येते

चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध