Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 या अंतर्गत मौजे छडवेल पखरून येथे पौष्टिक तृणधान्य विषयी कृषी सहाय्यक जे बी पगारे यांनी माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 या अंतर्गत मौजे छडवेल पखरून येथे पौष्टिक तृणधान्य विषयी कृषी सहाय्यक जे बी पगारे यांनी माहिती दिली.
भारत सरकारने वर्ष 2018 हे राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले. भारत सरकारकडून संयुक्त राष्ट्र संघास मार्च 2021 मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला संयुक्त राष्ट्र संघाच्या झालेल्या 75 व्या सभेत ठराव मंजूर झाला 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य व साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले 6 डिसेंबर 2023 रोजी इटली येथे उद्घाटन समारंभ झाला.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तृणधान्य ही लोक चळवळ व्हावी. नागरिकांची आरोग्यात सुधारणा व्हावी .
भारत हे तृणधान्याचे जागतिक केंद्र व्हावे हे लक्ष आहे.
याचे उद्देश, पौष्टिक तृणधान्य क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे. पौष्टिक तृणधान्याची मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे. पौष्टिक तृणधान्य लोकांच्या आहारातील वापर वाढवणे. पौष्टिक तृणधान्याचे आहार व आरोग्य विषयक महत्त्व प्रचार प्रसार करणे. उत्पादन व आहारातील वापर वाढीसाठी विविध उपक्रम राबवणे . पौष्टिक तृणधान्य निर्यातही चालना देणे. तृणधान्य पिकांची वैशिष्ट्ये.
तृणधान्य पिके कमी कालावधी येतात. कोरडवाह क्षेत्रावर हलक्या जमिनीत येतात, कमी पाण्यावर येतात. तृणधान्य पिके कमी खर्च व साधनसामुग्री येतात. तृणधान्य पिके हवामान बदलास अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत तग धरतात. तृणधान्य पिकांच्या माध्यमातून देश खाद्य बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो. तृणधान्य पिके पोषक मूल्य व आरोग्यवर्धक गुणांनी संपन्न आहेत.
तृणधान्याचे महत्व -तृणधान्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.
तृणधान्य तंतुमय पदार्थाचे भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते. खनिजे व जीवनसत्वे भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तंतुमय पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास फायदेशीर. स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण. डायबिटीस प्रतिबंधक करण्यास मदत. रक्तदाब कमी करण्यास प्रभावी. हृदयरोग प्रतिबंध करण्यास मदत. दमा सारख्या श्वसन रोगावर गुणकारी. मूत्रपिंड, यकृत यांचे काम सुरळीत चालण्यास किफायतशीर. बुद्ध कोष्टता पोटातील अतिरिक्त गॅस, सूज ,कॅम्पिंग यावर गुणकारी. ऍसिडिटी, वजन कमी करणे यासाठी उपयुक्त. अशाप्रकारे भरपूर फायदे तुनधान्य पिके खाल्ल्याने होतो.
यावेळी गावातील उपसरपंच श्री सचिन पाटील, प्रवीण गुलाबराव नांद्रे. मुरलीधर सिताराम नांद्रे, पोपटराव गोविंदराव पवार, मोरे दादाजी सुपडू, लक्ष्मण नामदेव नांद्रे, चंद्रकांत सुखदेव नांद्रे, प्रवीन गोरख भंडारी, विनायक त्र्यंबक नांद्रे, लहू पंडित मोरे, रमेश जयराम निकम, सुधाकर नारायण भंडारी, सुरेश दादाजी महिरे, कुंदन वाघ ,विजय निकम, झुलाल मालचे. असे मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माननीय मंडळ कृषी अधिकारी साक्री श्री. एस. बी .शिंदे व तालुका कृषी अधिकारी श्री .सी.के.ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा