Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यां च्या निवडणुकीत भाजपाला धक्का किरण पाटलांचा विजय.....!!
धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यां च्या निवडणुकीत भाजपाला धक्का किरण पाटलांचा विजय.....!!
धुळे - येथील जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत भाजपाचे दोन सदस्य तर राष्ट्रवादी च्या एका सदस्याचा विजय झाला आहे. दरम्यान झालेल्या या निवडणुकीत भाजपाच्या सदस्यांची मते फुटले असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू होती. अनपेक्षित रीत्या निकाल लागल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांपैकी 3 सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली. यात भाजपाकडून तुषार रंधे, कुसुम निकम व संग्राम पाटील हे रिंगणात होते. तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे किरण पाटील हे संग्राम पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. यात झालेल्या मतमोजणी मध्ये भाजपाचे कुसुम निकम व तुषार रंधे यांचा विजय झाला आहे तर संग्राम पाटलांना पराजित करून राष्ट्रवादीचे किरण पाटील हे महाविकास आघाडी कडून विजयी झाले आहे. या झालेल्या निवडणुकीत भाजपा सदस्यांची मते फुटल्याने भाजपावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. एकंदरीतच किरण पाटलांचा विजय झाल्याने जिल्हा परिषदेच्या आवारात महाविकास आघाडीचे नेत्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा