Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३
राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे आजाद मैदानावर आंदोलन व उपोषण....
मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य राज्यातील सक्रिय माहिती अधिकार कार्यकर्ते व विविध माहिती अधिकार संबंधित संघटनांचे पदाधिकारी हे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दिनांक एक मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजेपासून आजाद मैदान मुंबई येथे आपले आंदोलन व उपोषण सुरू करत आहेत.या देशात सुरू असलेली माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व कार्यकर्त्यांसमोरील आव्हाने याबाबत राज्यात विविध संघटना सक्रियपणे कार्यरत आहेत.आजपर्यंत माहिती अधिकारातून प्रामाणिक कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारचे गंभीर प्रकरणे व भ्रष्टाचार बाहेर काढला आहे.अनेकांना खोटे गुन्हे व प्राणघातक हल्ले तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.अशा सर्व परिस्थितीत माहिती अधिकार कायद्याचे व कार्यकर्त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत.
आंदोलनांच्या सरकारकडे प्रमुख मागण्या खालील प्रमाणे....
१. माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.
२.आयुक्तांची निवड पत्रकार,शास्त्रज्ञ,निवृत्त न्यायाधिश व समाज सेवक यांच्यातून करा.
३.माहिती अधिकारांचा सामान्य जनतेमध्ये प्रसार व प्रचार व्हावा यासाठी वार्षिक १०० कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करा.
४.जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांना प्रशिक्षण सक्तीचे करा.
५.प्रत्येक सरकारी कार्यालयात कलम -४ ची काटेकार अंमलबजावणी करा.
६.माहिती अधिकारांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करा.
शासन व प्रशासन माहिती अधिकार कायदा संपवायला निघाले असून आता लढलो नाहीत तर माहिती अधिकार कायदा संपून जाईल.म्हणून रस्त्यावर उतरून लढायची तयारी ठेवा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा