Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील सर्व पक्षीय व विविध संघटना मार्फत शेतकऱ्यांचे गटविकास अधिकारी यांचा कार्यालयात ठिय्या आंदोलन, मात्र साक्री पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी गैरहजर
साक्री तालुक्यातील सर्व पक्षीय व विविध संघटना मार्फत शेतकऱ्यांचे गटविकास अधिकारी यांचा कार्यालयात ठिय्या आंदोलन, मात्र साक्री पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी गैरहजर
आज दिनांक 22/2/ 2023 रोजी साक्री तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती साक्री यांच्या दालनात शेकडो कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले याप्रसंगी निवेदन देऊन शेतकऱ्यांनी आपले गार्हाणे मांडण्यात आले साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आज थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यात आले बिरसा मुंडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोहयो सिंचन विहीर फळबाग योजना सह इतर योजनाचे कामे त्वरित मंजूर करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा या विषयावर अनेकदा निवेदने देऊन देखील पंचायत समिती प्रशासन झोपेचं सोंग घेऊन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही तरी येत्या आठ दिवसात अंतिम मंजुरी प्रशासनाने दिली नाही तर येणाऱ्या काळात कठोर पावले उचलले जातील व पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून पंचायत समितीचे सुप्रिटेंडेंट माळीच साहेब यांना निवेदन देण्यात आले मात्र गेल्या तीन तासापासून शेतकरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बसलेले असून देखील स्वतः गटविकास अधिकारी उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या गाऱ्हाणे नेमके कोणाकडे मांडायचे हा प्रश्न वंचित लाभार्थ्यांना पडलेला आहे परंतु या काही दिवसात कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली नाही तर होणाऱ्या आंदोलनातून होणाऱ्या हानीस जबाबदार पंचायत समिती प्रशासन असेल याची पूर्व कल्पना निवेदनातून देण्यात आले आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा