Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा हे नंदुरबारात गुढीपाडवा,रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला येण्याची शक्यता...! मा.चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती...
शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा हे नंदुरबारात गुढीपाडवा,रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला येण्याची शक्यता...! मा.चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती...
नंदुरबार प्रतिनिधी:शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा हे नंदुरबारात गुढीपाडवा, रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला येण्याची शक्यता आहे.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निमंत्रीत करण्यात आले असल्याची माहिती रघुवंशी यांनी दिली.
आमदार रघुवंशी हे नंदुरबारातील ज्ञानदीप सोसायटीतील ओंकारेश्वर महादेव मंदीरात कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते.त्यांनी सांगितले,नंदुरबारातील हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.तीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर येण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
हॉस्पीटलच्या उद्घाटनांतर एक किंवा दोन तासांची शिवमहापुराण कथा देखील होणार आहे.त्यांना पुर्ण सात दिवसांच्या कथेसाठी आमंत्रीत करण्यात आले,परंतु येत्या एक ते दीड वर्षापर्यंत त्यांच्या तारखा बूक असल्याने ते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे एका दिवसाच्या दौऱ्यावर ते येणार असल्याचे रघुवंशी यांनी स्पष्ट केले.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असतील.त्यांनाही निमंत्रीत करण्यात येणार असल्याचे रघुवंशी यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, माजी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार, मनिषा चेतन वळवी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा