Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

सटाणा ताहाराबाद रस्त्याच्या समस्यांबाबत तरसाळी फाटा येथे बिंदु शेठ यांचा नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला यश... मिळुन रस्त्याच्या कामाला सुरुवात...



साक्री प्रतिनिधी : विंचुर प्रकाशा महामार्ग ७‌ चे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करुन नविन रस्ता काँक्रिटीकरणाचे काम शासनाच्या वतीने चालु करण्यात आले आहे,परंतु काम घेतलेल्या ठेकेदाराकडून काम करतानां फार दिरंगाई केली जात असल्याने,गेल्या तिन वर्षापासुन काम चालु आहे परंतु अजूनही काम पूर्ण होत नाही,राष्ट्रीय महामार्गात रूपांतरण झाल्यानंतर सदर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले होते. सध्या वनोली ते सटाणा दरम्यान सदर रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रेटीकरण करण्याचे काम चालु असुन तसेच मागील एक ते दिड महिन्यापासुन काम 100% बंद होते, रस्ता ठिकठिकाणी खोदुन ठेवलेला असल्यामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर धुळीचे प्रमाण वाढलेले असुन वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नसल्यामुळे रोज छोटे मोठे अपघात होत असून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोकांना दुखापती होत आहेत.अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांवर मोठ्याप्रमाणावर धुळीचा संचय होत असुन परिणामी पिकाच्या वाढीस बाधा निर्माण होत असुन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असुन आधिच संकटात असलेल्या शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,“सदर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्था बाबतीत दि.९ फेब्रुवारी रोजी तरसाळीचे माजी सरपंच लखन पवार वनोलीचे सरपंच शरद भामरे,औंदाणेचे सरपंच भरत पवार,साई सावली फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत कोठावदे,भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा,सुधाकर पाटील यांच्यासह वनोली,तरसाळी, औंदाणे गावातील संतप्त नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर तरसाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी एम एस आर डीसी विभागाचे अधिकारी श्री डि.एस.पवार व श्री दिलिप वानखेडे यांनी आंदोलन स्थळी भेट देवून कार्यकारी अभियंता श्री पि.एस.आवटे यांचे आंदोलन कर्त्यांशी दुरध्वनीवर बोलणे करून देत दि.२५ फेब्रुवारी पर्यंत काम चालु करणे बाबत लेखी आश्वासन देवुन आंदोलन स्थगित करण्यात आले होते,त्यानुसार आज दि.२० फेब्रुवारी रोजी काम चालु करण्यात आले, व आता सुरळीतपणे काम चालु ठेवुन लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन एम.एस.आर.डी.सी विभागाचे मा.दिलिप वानखेडे,यांनी दिले आहे यावेळी टिम लिडर अस्थाना साहेब, बाविस्कर साहेब ठेकेदाराकडून प्रतिनिधी किरण पाटील, अक्षय मोहळकर आदीसह परीसरातील नागरिक उपस्थित होते..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध