Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

देसले हॉस्पिटल साक्री (आयुष्यमान भारत योजना)* *ग्रामपंचायत शेणपूर व जयहिंद प्रतिष्ठान यांचा संयुक्त विध्यमा नाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन



शेणपूर येथे आज दिनांक 27/ 2/ 2023 रोजी ग्रामपंचायत शेणपूर येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत गावातील शेकडो जेस्ट रुग्णांवर शेणपूर येथील जय हिंद प्रतिष्ठान व शेणपूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णावर मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेत यामध्ये विविध आजारांवर म्हणजेच किडनी स्टोन मूत्राशयाचे आजार,हाडांसंबंधी आजार मुळव्याध अशा विविध गंभीर आजारांवर निशुल्क तपासणी व उपचार शस्त्रक्रिया डॉ.स्वप्निल भदाणे व डॉ.राहुल गोसावी ए. डी.एम.योगेश काकूंस्ते व नर्स शीतल वळवी यांच्या उपस्थितीत तपासणी करून डॉ.अजिंक्य भास्कर देसले साक्री यांच्या देसले हॉस्पिटल साक्री येथे पुढील उपचारांसाठी पेशंटला पाठवण्यात येणार आहे तसेच त्यांच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रिया किंवा विविध तपासण्या या केल्या जाणार आहेत तरी गावातील सर्व उपचार घेणाऱ्या रुग्णांनी उद्या ठीक अकरा वाजता हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स वाहनात घेऊन जाऊन उपचार केले जाणार आहेत याची गावातील रुग्णांनी नोंद ग्यावी यावेळी गावातील सरपंच चंद्रकांत काळे,उप सरपंच भूर्या पवार,पोलीस पाटील हेमराज काळे,ग्रामसेवक उज्वला निकम ग्रामपंचायत कर्मचारी,जेष्ठ नागरिक,तरुण,यात मुख्यत्वे जय हिंद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री.आकाश काकुस्ते,पृथ्वीराज काकुस्ते,ललित काकुस्ते, राजशेखर अहिरराव,प्रवीण काकुस्ते,चंद्रशेखर अहिरराव,तुषार काकूंस्ते,आदी चा सहकार्याने हे शिबीर पार पडले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध