Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

अमळनेर धरणगाव रस्त्यावर कुर्हे शिवारात गुरांनी भरलेल्या ट्रकचा पाठलाग करुन त्यातील गुरे उतरवून ट्रक जाळणा-या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले अटक



अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर धरणगाव रस्त्यावर कुर्हे शिवारात गुरांनी भरलेल्या ट्रकचा पाठलाग करुन त्यातील गुरे उतरवून ट्रक जाळणा-या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.अक्षय सुनिल पाटील,निखील चंद्रशेखर पाटील,चेतन रविंद्र पाटील,भट् दिलीप पाटील (रा.शनीपेठ वर्णेश्वर महादेव रस्त्यावर पैलाड,अमळनेर जिल्हा जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.अमळनेर धरणगाव रस्त्यावर कुर्हे शिवारात घडलेल्या या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गु.र.नं.५८ / २०२३ भादवि कलम १४३,१४७,१४९, ३३७,४३५ नुसार अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता.या या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव जनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.संदिप पाटील,पोना प्रविण मांडोळे,परेश महाजन,दिपक शिंदे आदींनी सहभाग घेतला.गुन्ह्यात वापरलेले वाहन मारुती एरटीगा हे वाहन जप्त करण्यात आले असून चौघांना पुढील तपासकामी अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध