Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
बारावी'च्या परीक्षा केंद्रावर पाहणी करत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षकांनी केले स्वागत..* *सीएस बाफना हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांनी दिल्या शुभेच्छा...
बारावी'च्या परीक्षा केंद्रावर पाहणी करत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षकांनी केले स्वागत..* *सीएस बाफना हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांनी दिल्या शुभेच्छा...
धुळे - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील फागणे येथील सी एस बाफना हायस्कूल या परीक्षा केंद्रावर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केेले व परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.......
12 वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. अभियान”राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे अशा सूचना आल्या आहेत
त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातही शासनाच्या आदेशान्वये कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.तर आज धुळे तालुक्यातील
फागणे गावातील सी एस बाफना हायस्कूल या संवेदनशील केंद्राची पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना कॉफी मुक्त तणामुक्त वातावरणात परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करून गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केलं आहे.तसेच परीक्षा केंद्रावर कॉफी संदर्भात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिला आहे.
तरी जिल्ह्यात बारावी साठी 45 परीक्षा केंद्र असून त्यात 34 संवेदनशील व 11 असंवेदनशील
केंद्र आहेत तर दहावी साठी 66 परीक्षा केंद्र असून त्यापैकी 44 संवेदनशील, व 10 असंवेदनशील
केंद्र असल्याची माहिती ही पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे..
परीक्षा केंद्रावर बंदोबस्त तैनात करण्यात आला यावेळी बंदोबस्तला पीएसआय अनिल महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, योगेश पाटील, पो.हवालदार कांबळे, तसेच फागणे बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शिंदे, सुमित ठाकूर, व होमगार्ड कर्मचारी यावेळी उपस्थित होते.....
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा