Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
कवी यशवंत निकवाडे यांच्याकडून माणूसकिचे दर्शन....
शिरपूर प्रतिनिधी-रविवारी संध्याकाळी नेहमी प्रमाणे यशवंत निकवाडे व त्यांच्या धर्मपत्नी फिरावयास निघाले.परत येतांना करवंद नाक्यावर एक चामडी बॉक्स मध्ये काहीतरी पडलेले दिसले.त्यांनी ते उचलले आणी घरी परतले.त्याच्यात एक महागडा 25000 चा मोबाईल होता.तो बोराडी फार्म सी महाविद्यालयाचा प्राध्यापकाचा होता त्यांनी तो नवीनच घेतला होता.
त्या मोबाईलवरून call आला. निकवाडे सरांनी तो उचलून त्या व्यक्तीशी संवाद साधला.निकवाडे म्हणाले तुमच्या मोबाईल सुरक्षित आहे.त्यांना निकवाडेंनी घराचा पत्ता व मोबाईल नंबर दिला.त्यांना निकवाडेंनी घरी बोलावले.ते निकवाडेंचा घराचा पत्ता शोधत घरी आले.ते मोबाईल हरवल्या मुळे बेचैन झाले होते.
निकवाडेंनी त्यांना पाणी दिले.चहा दिला व त्यांच्या मोबाईल सन्मानाने परत केला.त्यांच्या मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांना खूप भरूनआले. कोणत्या शब्दात आभार मानावे हे त्यांना समजत नव्हते.त्यांचे मन भरून आले.जातांना ते म्हणाले,आपल्या सारखे लोक या कलियुगात भेटण खरच दुर्मीळ आहे.
डोळ्यात आनंद अश्रु गाळत ते आनंदाने परत गेले.या घटनेमुळे माणुसकी अजून जिवंत आहे हे समजते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा