Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
धुळे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,घरफोडी करणारा आरोपी २४ तासाच्या आत गजाआड.
धुळे - सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपींना 24 तासाच्या आत जेरबंद करण्यास चाळीसगाव रोड पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
या आरोपीतांकडून 36,705 रुपये किमतीचा मुद्देमाल ही हस्तगत करण्यात आला आहे...
याबाबत माहिती असे की मकसुद अली सैय्यद अली रहाणार गफूर नगर वडजाई रोड हे कुटूंबासह घराचे वरील मजल्यावर झोपेत असतांना दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी च्या मध्यरात्री दरम्यान अज्ञात इसमाने घराच्या तळ मजल्यावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील 44 हजार रुपये रोख रक्कम व 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने
असा एकूण 59 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या चोरांनी चोरून नेला होता....
त्यावरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे तपासात असतांना सी. सी. टी.व्ही फुटेज व गुप्तबातमीदा रामार्फत शोध पथकातील कर्मचारी यांनी संशयीत वसीम शेख याची माहिती घेतली असता तो मालेगाव जि नाशिक येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यास शोध पथकातील कर्मचारी यांनी मालेगाव येथे जावून ताब्यात घेवून त्यास विचारपुस करता त्याने नमुद गुन्हयाची कबुली देवून त्याचे सोबत असलेला साथीदार आबीद अन्सारी हा असल्याचे सांगितले. त्याला ही वडजाई रोड परिसरातून ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदरची घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यात आरोपी वसीम
जनुददीन शेख वय 33 रा. चाँदतारा चौक, माधवपुरा, धुळे आबीद हुसेन अन्वर हुसैन अन्सारी वय 36 रा. वडजाई
रोड धुळे यांचेकडून तपासा दरम्यान चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी 36 हजार 705 रु किं चा मुद्देमाल त्यात 21 हजार 705 रुपये रोख व 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. 24 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस करण्यात आल्याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचं कौतुक करण्यात आले आहे..
याबाबत पुढील तपास अविनाश वाघ हे करीत आहे
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे सहा. पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा