Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३
मुंबई आझाद मैदानावर संगणक ग्राम पंचायत संगणक परिचालक संघटनेचा मोर्चा धडकणार.
आज दि.23/02/2023 रोजी महाराष्ट्र ग्राम पंचायत संगणक परिचालक यांच्या वतीने संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात म. गटविकास अधिकारी प. स. साक्री व तालुका समन्वयक assk प. स. साक्री यांना निवेदन देण्यात आले,
राज्यात 27000 ग्राम पंचायत संगणक परिचालक हे 6 कोटी जनतेला 2011 पासून विविध ऑनलाईन सुविधा देत आहेत व अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे असताना देखील संगणक परिचालक यांना अत्यंत अश्या तुटपुंज्या मानधन वर काम करावं लागतं आहे म्हणून संगणक परिचालक यांना यावलकर समितीच्या शिफारस नुसार संगणक परिचालक यांना ग्राम पंचायत सुधारित आकृती बंध मधे पद निर्मिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक आहे परंतु शासनाने अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देवून कोणताही ठोस निर्णय दिला नाही म्हणून विविध मागण्या मान्य करण्या संदर्भात दि.01 मार्च 2023 पासून मुंबई आझाद मैदान येथे राज्य संघटनेच्या वतीने मोर्चा निघणार आहे, तसेच दि.27 फेब्रू 2023 पासून काम बंद चे आंदोलन तालुका संघटनेच्या वतीने देण्यात आले, निवेदन देताना साक्री तालुका अध्यक्ष अंबालाल नेरकर उपाध्यक्ष विशाल साई सचिव प्रदीप भदाने, विनोद राठोड, साहेबराव कारंडे, रमेश सूर्यवंशी, कैलास जाधव, छोटीराम भोये, योगेश चव्हाण, शितल शेवाळे, वैशाली पानपाटील, लता शिंदे, आदी उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा