Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

शिरपूर शहर पो.स्टे.डी.बी.पथकाची कामगीरी (३६,००० /- रुपये किंमतीचे एकुण ०७ चोरीचे मोबाईलसह चोरटा जेरबंद



शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर शहर पो.स्टे.ला गु.र.नं. ५९/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हयात दि. १८/०२/२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजेचे सुमारास शिरपुर जि.धुळे येथील खंडेराव मंदीर समोरील दर्ग्याजवळ शिवशंभो पावभाजी सेंटर येथे फिर्यादी समाधान धुडकू धनगर वय ४१ व्यवसाय पावभाजी गाडी रा.कुंभारटेक शिरपुर जि.धुळे यांनी खंडेराव महाराज यात्रेत्सव निमीत्त पावभाजी गाडी लावुन व्यवसाय करीत असतांना त्यांनी त्यांचे पावभाजी गाडीवर ठेवलेला १५,०००/-रु.कि.चा व्हिवो कंपनीचा वाय ७३ मॉडेलचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले बाबत दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे तपासकामी पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर शिरपूर शहर पो.स्टे.यांनी डी.बी.पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने तपास चक्रे फिरवुन अज्ञात चोरटयाचा शोध घेत असतांना डी.बी. पथकास खंडेराव महाराज यात्रेत मध्ये संशयीत इसम नामे इमरान शकील मलक वय ३२ रा. इदगाह नगर शिरपुर जि.धुळे हा खंडेराव महाराज यात्रेत कमी किंमतीमध्ये मोबाईल विक्री करीत असल्या बाबत मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन त्याचा शोध घेतला असता त्याचेकडे फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मोबाईल सह इतर विविध कंपनीचे ३६,०००/- रुपये किंमतीचे एकुण ०७ मोबाईल हस्तगत करुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर,शोध पथकाचे पोउनि किरण बान्हे, पोहेकॉ ललित पाटील,पोना/ मनोज पाटील,पोकों/ गोविंद कोळी, विनोद अखडमल,प्रविण गोसावी, मुकेश पावरा,प्रशांत पवार, सचिन वाघ,आरीफ तडवी तसेच होमगार्ड नाना अहिरे,चेतन भावसार, मिथुन पावरा,शरद पारधी,राम भिल अशांनी मिळून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध