Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल....
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार सदर तरुणीचे शहरातील करवंद नाक्यावर 7 फेब्रुवारी रोजी चुलत आजोबा मयत झाल्याने त्यांच्याकडे दशविधी कार्यक्रमापर्यंत जाणे येणे सुरू होते.दरम्यान वाल्मिक नगर मधील चुलत आते भाऊ असलेल्या संशयितांचे देखील तेथे येणे जाणे सुरू होते.दरम्यान करवंद नाक्यावरील कॉलनीतील मयत आजोबाच्या घराच्या 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास सदर तरुणी इतर नातेवाईकांसह घरातील जिन्यावर बसलेली असतांना संशयीत तरुणाने घरात गहू कमी असून वरच्या मजल्यावरून काढून देण्यास सांगितले असता पीडित तरुणी गहू काढण्यासाठी वरच्या मजल्यावर जात असतांना जिन्यातच संशयीताने जवळ येत लव्हशिप राहण्याचे सांगितले त्यास नकार दिल्याने संशयिताने अंगलट करीत तोंड दाबून बळजबरी केली तसेच कोणाला न सांगण्याची तंबी दिल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा दाखल केली.
याप्रकरणी वाल्मिक नगर मधील संशयीत तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करीत संशयीत तरुणास शहर पोलीसांनी पहाटे अटक केली.पुढील तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत आहे.संशयतास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा