Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

शिरपूर शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी....जिवंत काढतुस,मोबाईल व मोटरसायकल सह मुद्देमालासह जप्त...



शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ए एस आगरकर यांना गोपनीय बातमीद्वारे एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस सह मोटरसायकल वरून जाणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी १३.२५ वाजेच्या सुमारास पंचां समक्ष सापळा रचून सदर इसमास रंगेहात पकडून मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांना इसम नामे साबीर शेख रा.कुंभार टेक शिरपूर हा अंगात काळ्या रंगाच्या टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला व काळ्या रंगाची टीव्हीएस अपाची मोटर सायकल वर बसून कुंभार टेक येथे ग्रीन टी हाऊस हॉटेल समोर येणार असल्याची बातमी प्राप्त झाली होती.

त्यानुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने दोन पंचां समक्ष बातमीच्या ठिकाणी जाऊन सापडा लावून इसम नामे साबीर शेख रऊफ शेख वय 24 रा.यादगार किराणा जवळ कुंभार टेक शिरपूर यास जागीच पकडले व त्याच्या कब्जातील देशी बनवटीचे गावठी पिस्टल जिवंत काढतुस,मोबाईल व मोटरसायकल असा माल जप्त करण्यात आला.

त्यात 25 हजार रुपये किमतीचे देसी बनावटीचे पिस्टल,२०० रुपये किमतीच्या लोखंडी जिवंत काढतुस, ५०,०००रुपये किमतीची टीव्हीएस अपाचे मोटरसायकल व 15 हजार रुपये किमतीच्या जुना मोबाईल असा एकूण 90 हजार २०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून पोलीस कॉन्स्टेबल ललित सुभाषराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय शास्त्र अधिनियम च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा चा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे करत आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ए एस आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस स्टेशन व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भाग व शोध पथकाचे पोलीस निरीक्षक किरण बाऱ्हे पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील ,गोविंद कोळी,विनोद खडमल,प्रवीण गोसावी, मुकेश पावरा ,प्रशांत पवार,स्वप्निल बांगर,अमित रणमळे,उमाकांत वाघ,भटू साळुंखे इत्यादींच्या पथकाने केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध