Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची भूमिका महत्वपूर्ण जिल्हाधिकारी जलज शर्मा
आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची भूमिका महत्वपूर्ण जिल्हाधिकारी जलज शर्मा
धुळे, दि. 23 : आपत्ती नैसर्गिक असो की, मानव निर्मित. या काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बैठकीत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती काळात महत्वाची भूमिका असलेल्या विविध विभागांची टेबल टॉप एक्झरसाईज (Table Top Exercise) बैठक जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे निरिक्षक एस. के. पासवान, अजय यादव, सुजीत कुमार, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे निरिक्षक दिलीप मंडळ, विजय गावंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, होमगार्ड चे मंगल पाटील, दिनेश मराठे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जितेंद्रकुमार इंगळे, शिक्षण विभागाचे मधुकर पाटील, पाटबंधारे विभागाचे निलेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सौ. उज्वला पाटील, भारत दूरसंचार निगमचे ए. ए. शिंदे आदिंसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आपत्ती काळात विविध यंत्रणा काम करीत असतात, आपत्तीचे व्यवस्थापन करतांना विभागांकडून काही उणीवा राहतात. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी टेबल टॉप एक्झरसाईजचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर आपत्तीचा सामना करताना अडचणी येवू नये याकरीता वेळोवेळी रंगीत तालीमचे आयोजन केले जाते. अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सुजीतकुमार यांनी बैठकीत दिली. तसेच आपत्ती काळात प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी पार पाडतांना घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास यंत्रणांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोठी हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 5 अधिकारी व 20 जवानांचे पथक धुळे जिल्ह्यात आले असून हे पथक जिल्ह्यातील विविध यंत्रणासोबत बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी बैठकीत दिली.
आज नकाणे तलावावर रंगीत तालीमचे आयोजन नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, होमगार्ड, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, शिक्षण विभाग, भारत दूरसंचार निगम, वीज वितरण कंपनी यांच्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची रंगीत तालीम शनिवार, दि. 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता नकाणे तलाव, धुळे येथे आयोजित करण्यात आली आहे. याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा