Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेणपुर गावात अत्यंत रहदारीच्या ठिकाणी धाडसी घरफोडी सुमारे दहा ते बारा लाखांच्या ऐवज चोरट्यांनी केला लंपास
शेणपुर गावात अत्यंत रहदारीच्या ठिकाणी धाडसी घरफोडी सुमारे दहा ते बारा लाखांच्या ऐवज चोरट्यांनी केला लंपास
काल दिनांक 23/2/ 2023 रोजी मध्यरात्री मौजे शेणपूर येथे गावाच्या मध्यभागी म्हणजेच रहदारीचा ठिकाणी श्री संजय उत्तम काकुस्ते रा.शेणपूर ता.साक्री जि.धुळे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.गेल्या दोन दिवसापासून श्री संजय काकुस्ते हे गावी गेले होते आज सकाळी दहा वाजेला त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.त्यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटीतून लॉकर तोडून सुमारे 18 तोळे सोने व आठ ते दहा हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्या असल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे.आजच्या सोन्याच्या बाजार भावानुसार तब्बल दहा ते बारा लाखाचा हा ऐवज असल्याचे समजते ग्रामीण भागातील शेणपूर गावात अंत्यत रहदारीच्या ठिकाणी ही मोठी चोरी पहिल्यांदाच झाली आहे. श्री संजय उत्तम काकुस्ते यांच्या फिर्यादी नुसार 18 तोळे सोने व आठ ते दहा हजाराची रोकड असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र देशमुख साहेब यांच्या अधिपत्याखाली पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव तसेच शेणपूरचे पोलीस पाटील हेमराज काळे यांच्या मदतीने तपासाला वेग देऊन लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावला जाईल असे प्रतिपादन श्री देशमुख साहेब यांच्याकडून करण्यात आले यावेळी धुळे जिल्हा मोबाईल स्कॉड पथक देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडील श्वान पथकाचा वापर करून चोरट्यांचा मार्ग निश्चित करण्यात आला व घरातील सर्व वस्तूंचे, हातांच्या ठशांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत यामुळे पोलीस तपासाला मोठी गती त्यांच्या मार्फत निश्चित मिळणार असे गावातील नागरिकांकडून व पोलीस प्रशासनाकडून बोलले जात आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा