Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हयात राज्य महावितरण कंपनीच्या प्रस्तावित विज दर वाढीच्या विरोधात ग्राहक पंचायत चे इ मेल द्वारे निवेदन
धुळे जिल्हयात राज्य महावितरण कंपनीच्या प्रस्तावित विज दर वाढीच्या विरोधात ग्राहक पंचायत चे इ मेल द्वारे निवेदन
धुळे - राज्य महावितरण विज कंपनीने 67हजार 444कोटी रूपये तुटीच्या भरपाई साठी 36%म्हणजे सरासरी प्रति यूनिट 2रूपये 55पैसे दर वाढ मागणीचा सादर केलेला प्रस्ताव ग्राहकांचे कंबरडे मोडणारे असून ही दर वाढ पूर्णपणे मागे घ्यावी या बाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या धुळे जिल्हा शाखेने वितरण कंपनीच्या जाहीर सुचनेनुसार महाराष्ट्र वितरण आयोग मुंबई कडे ई मेल मार्फत पाठविले.
महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने जवळपास 36%विज दर वाढ प्रस्तावित आहे. ही दर वाढ ग्राहकांच्या दृष्टीने हानिकारक असून,कंपनीने नियोजन केल्यास दरवाढ करण्याची गरज भासणार नाही.विजेची गळती जास्त आहे,ती तपासून कमी करणे,रास्त व स्पर्धात्मक दरात विज खरेदी करणे, थकबाकी वसूली करणे,आवाजवी खर्च कमी करणे,कामाचे योग्य नियोजन करणे, भ्रष्टाचार संपूर्णपणे हद्दपार करणे, कर्मचाऱ्यांची स्पर्धात्मक मानसिकता कमी करणे या सूचना व हरकती विद्युत नियामक अयोगाकडे जिल्हा ग्राहक पंचायत च्या वतीने विभाग अध्यक्ष डॉ.अजय सोनवणे,जिल्हा अध्यक्ष एड.जे.टी. देसले,जिल्हा संघटक प्रा. चंद्रकांत डागा, तालुका अध्यक्ष प्रा. पी. व्ही.दिक्षित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा