Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३
शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई : मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. मागील तीन दिवसापासून निवडणुक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर आज शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचं निरीक्षण नोंदवत. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा..‘भाजयुमो’चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर..! शहराध्यक्ष महेश लांडगे, युवा मोर्चाचे संकेत चोंधे यांचा पुढाकार
निवडणुक आयोगाकडे मागील काही दिवसांपासून सुनावणी सुरू झाली होती. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आवश्यक कागदपत्र जमा करण्यात आले होते. यातच ही सुनावणी सात खंडपीठाकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाला देण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद साजरा केला जात आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा