Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेणपूर येथे श्री नवनाथ महाराजांचा मंदिरात सालाबाधा प्रमाणे आज होमपूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
शेणपूर येथे श्री नवनाथ महाराजांचा मंदिरात सालाबाधा प्रमाणे आज होमपूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
शेणपूर येथे चाळीसे शिवारात कै.लाला विठोबा काकुस्ते याच्या शेतात त्यांचा परिवाराचे आराध्य दैवत श्री.नवनाथ महाराज यांचे पवित्र असे मंदिर स्थापण करण्यात आले आहे.दरवर्षी सालाबादा प्रमाणे फेब्रुवारी महिन्यात या मंदिरात भव्य असा सोहळा आयोजित करण्यात येतो कै.लाला तात्या यांच्या मोठ्या परिवाराकडून शेणपूर मध्ये हा महाप्रसादाचा कार्यक्रम दर वर्षी ठेवण्यात येतो.अतिशय श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक लोक श्री.नवनाथ बाबांच्या दर्शनासाठी येत असतात व आपल्या इच्छा आकांक्षा अडचणी मांडून नवस करीत असतात.अतिशय जागति ज्योत असे हे तीर्थक्षेत्र आहे अनेकांना त्याची प्रचिती आलेली आहे.याच ठिकाणी पवित्र भूमीत आज शेणपूर गावातील तमाम भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून गावातील सर्व भाविकांना आमंत्रित करण्यात आले आहे या ठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.या मंदिरात सर्व भाविक हे दरवर्षी श्रद्धापूर्वक भेट देत असतात.
श्री.नवनाथ महाराज चा मंदिरात होम हवन करून पूजाअर्चा केली जाते.अबालवृध्दांसह सर्वांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमात पहावयास मिळते.नवनाथांची नावे खालील प्रमाणे आहेत
गोरक्षनाथ,कानिफनाथ,नागनाथ,भरत्रीनाथ,रेवननाथ,मच्छीन्द्र नाथ,जालिंदरनाथ,गहिनीनाथ,चपरठीनाथ,या सर्व देवतांचा आशीर्वादाने कार्यक्रम सुरळीत पार पडला
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा