Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

नवडणे शिवारातील पांझरा नदीवरील केटीवेअरच्या जुन्या प्लेटा बदलून नवीन बंदिस्त प्लेटा त्वरित टाकाव्यात अन्यथा उपोषणाला बसू :- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे निवेदन



साक्री तालुक्यातील नवडणे व सायने शिवारातील पांझरा नदीवरील किती वेळच्या जुन्या प्लेटा बदलून नवीन बंदिस्त प्लेटा टाकण्यात यावे याबाबतचे निवेदन या अगोदर माननीय अभियंता सो धुळे पाटबंधारे विभाग धुळे यांना 02/01/2023 रोजी देण्यात आलेले होते गेल्या एक महिन्यात कोणत्याही प्रकारची धुळे पाटबंधारे विभागाकडून हालचाल होत नसल्यामुळे या कार्यालयास मा अभियंतासो धुळे पाटबंधारे विभागास पुनश्च स्मरणपत्र अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील(बाबा) खंडापूरकर, राष्ट्रीय समन्वयक श्री. गिरीराज महीराज, प्रदेश अध्यक्ष महिला विभाग एडवोकेट राणीताई स्वामी यांच्या आदेशाने देण्यात आले.
मौजे नवडणे व सायने शिवारात पांझरा नदीवर बऱ्याच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या केटीवेअरवर बंदिस्त प्लेटा बसविण्यात आलेले आहेत. सदर प्लेटांची अत्यंत दुरावस्था झालेली असून सदर केटीवेअर मध्ये साचलेले पाणी पूर्णपणे वाहून जात असल्याने नवडणे, सायने, गणेशपुर, कासारे, धाडणे शिवारातील दोन ते अडीच हजार कुटुंबीयांना एप्रिल व मे महिन्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्याकारणाने खूप मोठ्या प्रमाणावर जलसंकटात सामोरे जावे लागत असते. तरी आपल्या कार्यालयाकडून जुन्या प्लेटा काढून त्या ठिकाणी नवीन बंदिस्त प्लेटा टाकण्यात याव्यात सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता येत्या पंधरा दिवसाच्या आत आपल्या कार्यालयाकडून तात्काळ ठोस कार्यवाही करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी हे अमरण उपोषणात बसतील मग होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर धुळे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण-श्री सचिन पाटील, धुळे जिल्हा अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष (नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख) श्री अनिल दादा देसले, महाराष्ट्र प्रदेश मुख्य सेक्रेटरी श्री प्रवीण दादा बोरसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष महिला विभाग प्राजक्ता ताई देसले, धुळे जिल्हा अध्यक्ष परिवहन विभाग करुणाताई पाटील, साक्री तालुका अध्यक्ष श्री नितीन दादा ठाकरे, साक्री तालुका अध्यक्ष आदिवासी सेल श्री तुळशीराम जगताप, पिंपळनेर मंडल संघटक श्री भैय्यासाहेब पारधे. यांच्या स्वाक्षरी केलेल्या होत्या. मा. अभियंता सो. श्री. एन. एम. वट्टे यांना निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री. अनिल दादा देसले, तालुका अध्यक्ष व्यापारी असोसिएशन श्री. किशोर चौधरी, तालुका अध्यक्ष परिवहन विभाग श्री. श्रावण पाटील, तालुका संघटक परिवहन विभाग श्री. संजय बुवा हे उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध