Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० मार्च, २०२३

साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे मोफत वाटप भाजप नेते मोहन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले



आज दि. 29 मार्च रोजी खुडाणे व डोमकानी येथे आयुष्यमान भारत योजने अंतर्गत (आभा) कार्डचे 403 लाभार्थ्यांनाच्या कॅम्प घेऊन मोफत वाटप करण्यात आले या वेळी साक्री विधानसभा प्रमुख व पिंपळनेर मंडळ अध्यक्ष इंजि. मोहनराव सूर्यवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित आदिवासी आघाडी प्रदेश चिटणीस सौ. लीलाताई मोहन सुर्यवंशी . साक्री तालुका अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मा.मोहनजी ब्राह्मणे , प्रवीणजी  शर्मा ,सदाजी  महाजन खुडाणे चे मनोज महाजन डोमकानी उपसरपंच उमेश पवार  बुथ प्रमुख नवनीत दहिते  बुथ प्रमुख विजय बहाणे. व ग्रामस्थ  उपस्थित होते या वेळी मनोगत व्यक्त करताना मा. इंजि मोहनराव सूर्यवंशी यांनी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनेक योजनांची व मतदार संघात केलेल्या विकास कामाची जनतेला माहिती सांगितली या पुढेही अनेक योजना ह्या प्रत्येक घरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याची भावना व्यक्त केली आहे. या योजनेचा जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान इंजि. मोहनराव सूर्यवंशी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज सोनवणे यांनी केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध