Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गोपनीय पथकाची कामगिरी महाविद्यालयीन तरुणी कडून मोबाईल पळवणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला अवघ्या दोन तासात केले अटक,
शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गोपनीय पथकाची कामगिरी महाविद्यालयीन तरुणी कडून मोबाईल पळवणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला अवघ्या दोन तासात केले अटक,
शिरपूर प्रतिनिधी – महाविद्यालयीन तरुणी कडून मोबाईल हिसकावून पळवणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला अवघ्या दोन तासात अटक अटक करण्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला यश आले आहे.
याबाबत फिर्यादी महाविद्यालयीन तरुणी हिने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल Shirpur Crime Breaking केली होती त्यात आपण आपल्या मैत्रिणी सोबत बालाजी नगर मधून पायी करवंद नाक्यावरील मंदिरात जात असताना त्यांच्या मागून मोटरसायकलवर येणाऱ्या दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या हातातून बळजबरीने रीयल मी सी ३१ कंपनीच्या मोबाईल हिसकावून मोटरसायकल वरून पळ काढला म्हणून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 132 /2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांनी आपल्या गोपनीय पथकास त्वरित तपास चक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे संशयमांचा शोध घेण्यासाठी आदेशित केले.त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवून फुटेज मधील वर्णनानुसार शोध घेतला असता पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे दिलीप सुदाम कोळी व त्याच्या साथीदाराने सदरच्या गुन्हा केला असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या शोध घेतला असता अवघ्या ०२ तासात त्यांना मांडळ गावाच्या गेट जवळ शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले. सराईत गुन्हेगार दिलीप सुदाम कोळी व त्याच्या साथीदार तुकाराम गोविंद मराठे रा.वाल्मिक नगर शिरपूर जि.धुळे असे मिळून आल्याने त्यांना विचारपूस करता त्यांनी सदरच्या गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांच्या अंग झेडती मध्ये चोरीस गेलेला मोबाईल फोन मिळून आला तसेच त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची मोटरसायकल एचएफ डीलक्स मिळून आले.सदरची मोटरसायकल देखील म्हसदी तालुका साक्री येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.त्यामुळे त्यांच्याकडून ०८हजार रुपये किमतीच्या मोबाईल फोन व 40 हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 48 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची रिमांड कस्टडी दिली असून पुढील तपास कॉन्स्टेबल लादुराम चौधरी करत आहेत.
विशेष म्हणजे यातील आरोपी दिलीप सुदाम कोळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीचे ०५ गुन्हे, घरपोडीचे ०३ गुन्हे ,जबरी चोरीचे ०२ गुन्हे दोंडाईचा पोलीस स्टेशनला ०१ गुन्हा ,जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा ०१ गुन्हा ,नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनला चोरीचा ०१ गुन्हा, शहादा पोलीस स्टेशनला चोरीचा ०१ गुन्हा ,गुजरात राज्यातील कडोदरा येथील पोलीस स्टेशनला ०१ गुन्हा व नाशिक जिल्ह्यातील छावणी पोलीस स्टेशनला चोरीचा ०१ असे एकूण 17 जबरी चोरीचे व मोटरसायकल चोरीचे घरपोडीचे गुन्हे त्यावर दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस.आगरकर, शिरपूर पोलीस स्टेशन तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर तसेच शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील ,लादूराम चौधरी ,मनोज पाटील, गोविंद कोळी ,योगेश दाभाडे ,मुकेश पावरा, विनोद अखडमल ,प्रशांत पवार ,मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंखे तसेच होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी व आकाश पावरा इत्यादींच्या पथकाने केले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा