Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

साक्री तालुक्यातील दिघावे येथे शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याच्या आयोजन




साक्री प्रतिनिधी:- साक्री तालुक्यातील काठवान भागासह सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचा समस्यासाठी भव्य शेतकरी मेळावाचे आयोजित करण्यात आला आहे. उद्या दि. 4/3/2023 रोजी शनिवारी दिघावे ता.साक्री जि.धुळे येथे दुपारी 3 वाजता या भव्य अशा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना शासनाच्या माध्यमातून व्हाव्यात यासाठी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपअध्यक्ष श्री बिंदू शेठ शर्मा यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.यामध्ये साक्री तालुक्यातील मुख्य समस्या वर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

काटवान परिसरात मुख्य समस्या ही शेतीपंपाच्या वीज पुरवठा या  संदर्भात आहे.या विषयावर गेली अनेक वर्ष ही समस्या शेतकऱ्यांना सतावते आहे. तसेच वन्य प्राण्यांचे जनावरांवर हल्ले व ही देखील समस्या काटवान भागासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.त्यावरही चर्चेला वाव दिला जाणार आहे.

या मेळाव्याचे मुख्य केंद्रबिंदू शेतकरी मित्र बिंदू शर्मा हे आहेत. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांवर अनेकदा आपली भूमिका परखडपणे शासन दरबारी मांडण्याचे काम आज पर्यंत बिंदू शेठ शर्मा यांनी अंत्यत चोख बजावले आहे याची अनेक उदाहरणे साक्री तालुक्यातील शेतकरी देऊ शकतात.राज्य सरकारने त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना अजून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या द्याव्यात असेही जनतेतून बोलले जात आहे. अत्यंत होतकरू,परखड, हजरजबाबी,
आणि डॅशिंग असं नेतृत्व उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या संदर्भात न्याय निवाडा करण्यासाठी भाजपला मिळाले आहे हे देखील भाग्यच म्हणता येईल.या दिघावे येथील शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या या खालील प्रमाणे आहेत

1) शेतकऱ्यांचा डीपी जळाला तर कमीत कमी 48 तासाच्या आत संबंधित अधिकाऱ्याने नवीन डीपी बसवलीच पाहिजे असा कायदा आणि शासन निर्णय आहे.

2) शेतकरी पिक विमा संदर्भात असलेल्या विविध समस्या व विमा कंपनी आणि शेतकरी यांच्यातील सुसंवाद व्हावा व शासनाला याची इतंबूत माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर योग्य तो मार्ग काढला जाईल.

3) राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे व पीक कर्जाला सिविल स्कोर हा निकष लावू नये असा शासन निर्णय असून देखील बँक शेतकऱ्यांना विठीस का धरतात यासंदर्भात. 

4) शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जावर किंवा इतर शेती विषयक कर्जावर (OTS) सवलत मिळत नसल्याच्या समस्यांबाबत चर्चा करणे.
अशा एक ना अनेक समस्या बाबत चर्चा करण्यासाठी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी साक्री तालुक्यातील काटवान भागासह सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.
शेतकरी मित्र व भाजप किसान मोर्चाचे उप प्रदेशाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांच्याकडून जाहीर आवाहन

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध