Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
कर्तव्यदक्ष पोलिसांनी सार्थ केले आपले ब्रीदवाक्य शेवटी म्हणतात ना "कानून के हाथ बहुत लम्बे होते है" प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश....
कर्तव्यदक्ष पोलिसांनी सार्थ केले आपले ब्रीदवाक्य शेवटी म्हणतात ना "कानून के हाथ बहुत लम्बे होते है" प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश....
शिरपूर प्रतिनिधी : दिनांक २४/०२/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वा चे सुमारास तरडी शिवारातील श्री.गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतात एका अनोळखी तरुणाचे ओढणीने दोन्ही हात पाठीमागे बांधून व त्याच ओढणीने त्याचा गळा आवळून त्यास जिवेठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मक्याच्या शेतात मृतदेह मिळून आला होता.
खुनाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर मयत व मारेकरी दोन्ही अज्ञात असल्याने व कोणताही परिस्थितीजन्य पुरावा समोर नसल्याने या गुन्हा चा तपास करणे पोलिसांसमोर एक मोठेच आव्हान होते.
सदरची खबर मिळताच धुळे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे,श्री.अन्साराम आगरकर, पोलीस निरीक्षक तथा प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी,शिरपुर विभाग, शिरपुर,श्री.हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक,स्था.गु.शाखा, धुळे, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी व स्टॉफ तसेच थाळनेर पोलीस स्टेशन चे सपोनि श्री. उमेश बोरसे,पोसई कृष्णा पाटील व त्यांचा स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.या अज्ञात मयताचा अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी निघृण खून केल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसां समोर मोठे आव्हान होते. या निघृण खुनाचा छडा लावणे बाबत तसेच यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड यांनी श्री. हेमंत पाटील,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेस व श्री.उमेश बोरसे,सहा.पोलीस निरीक्षक,थाळनेर पो.स्टे यांना आदेश दिले होते.
मा.पोलीस अधीक्षक साो,यांचे आदेश व मार्गदर्शना प्रमाणे गुन्हयाचे तपासात यातील मयत हा मुकेश राजाराम बारेला वय अंदाजे ३० वर्ष रा.चाचन्या ता संघवा जि.बडवाणी असा असल्याचे निष्पन्न करून घटनास्थळावर मिळून आलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे गोपनिय माहिती,सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषण करून
संशयीत नामे
१) सुशिल उर्फ मुसल्या जयराम पावरा वय-३० व्यवसाय मजुरी रा. होळनांथे २) दिनेश उर्फ गोल्या वासूदेव कोळी वय १९ व्यवसाय मजुरी रा.होळनांथे ३) जितू उर्फ दूंगऱ्या लकडया पावरा वय २० रा. होळनांचे ता. शिरपुर जि. धुळे व त्यांची महिला साथीदार अशांना पोरबंदर (गुजरात) येथून व होळनांथे येथून ताब्यात घेवून त्यांना गुन्हयाबाबत विचारपूस करता त्यांनी यातील मयतास अनैतिक संबंधातून खुन केल्याची कबूली दिली आहे. अशा प्रकारे थाळनेर पो.स्टे. गुरनं ३० / २०२३ भाविक क ३०२, २०१ प्रमाणे दाखल निघृण खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. यातील मयताच्या पत्नीचे आरोपी क्र.१ सुशिल पावरा याचेशी अनैतिक सबंध होते. तिला २ मुले आहेत..अत्यंत नियोजनबध्द व क्रूर हत्येचा कोणतेही परिस्थितीजन्य पुरावे समोर नसताना स्थानिक गुन्हे शाखा व थाळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी अशांनी अवघ्या ४ दिवसात छडा लावून कोणताही पुरावा नसतांना खुना सारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे,प्रभारी उप वि.पो.अधिकारी,शिरपुर विभाग, शिरपुर श्री अन्साराम आगरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,सपोनि उमेश बोरसे,पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोसई कृष्णा पाटील,असई संजय पाटील,पोहेकॉ प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, रविद्र माळी,पोना मायुस सोनवणे, पोशि/ अमोल जाधव, सुनिल पाटील, महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, योगेश जगताप, योगेश साळवे, योगेश ठाकुर,चालक कैलास महाजन, थाळनेर पो.स्टे.चे असई/ किशोर चव्हाण,पोहेकी शाम वळवी, संजय धनगर,पोना/भुषण रामोळे, ललीत खळगे,मनोज पाटील,दत्तू अहिरे, सिराज खाटीक,योगेश दाभाडे, धनराज मालचे,भटू साळुंके,चालक हेकों पगार व पोशि दिलीप मोरे यांच्या पथकाने केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा