Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे एसटी प्रवासात महिला सन्मान योजना सुरु झाल्याबद्दल आनंदोत्सव
शिरपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे एसटी प्रवासात महिला सन्मान योजना सुरु झाल्याबद्दल आनंदोत्सव
शिरपूर प्रतिनिधी : गावापासून महानगरा पर्यंत प्रवासात प्रत्येक प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या एसटी महामंडळा तर्फे दि.१७ मार्चपासून महिला सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली असून आता प्रत्येक महिलेस ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता करता येणार आहे.
योजना सुरुवात झाल्याबद्दल शिरपूरात भाजपा महिला मोर्चा तर्फे माजी नगराध्यक्षा सौ.संगिता देवरे, जिल्हा सरचिटणीस तसेच माजी नगरसेविका सौ.मोनिका रोहीत शेटे,श्रीमती स्मिता नाईक शहर उपाध्यक्ष,महिला मोर्चा, सौ.कल्पना कोळी तालुका उपाध्यक्ष ग्रामीण महीला मोर्चा,श्रीमती शालीनी सोनवणे शहर सरचिटणीस,सौ.प्रियंका अमोल सोनवणे शहर सरचिटणीस,सौ पल्लवी हेमंत पाटील,सौ.अरुणा बडगुजर.सौ.प्रिंयंका रविंद्र शेटे आदि महिलांनी शिरपूर बस स्थानकावर महिला प्रवासांना पेडे व गुलाब पुष्प देवुन स्वागत केले ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणुन लाल परीची ओळख आहे.या वेळी बस मध्ये प्रवास करून महिला प्रवाश्यांशी चर्चा करुन योजनेची माहिती दिली
व प्रबोधन करण्यात आले प्रवासी वर्गातुन या योजनेचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.लाल परीची सवारी महिला घेई भरारी ह्या घोषणा देऊन जल्लोष केला.दि.८ मार्चला महिला दिनी राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली महिला सन्मान योजना अमलात आली आहे.राज्य परिवहन महामंडळा तर्फे यापूर्वीच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत लागू केली आहे.
त्याचप्रमाणे महिला सन्मान योजना देखील जारी करण्यात आली आहे. मात्र महिलांना सन्मान योजनेत सरसकट सर्वच महिलांना सवलतीच्या दरात अर्धी तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे.या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांच्या मार्फत सर्वच विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुख यांना आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार साधी बस, नीम आराम बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये आता महिलांना ५० टक्के दरात प्रवास करता येणार आहे.
सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ.मोनिका शेटे, शहराध्यक्षा सौ.संगिता देवरे यांनी केले आहे.
या प्रसंगी निलेश प्रल्हाद चौधरी आगर व्यवस्थापक,मनोज पाटील स्थानक प्रमुख,सौ.बुध्द प्रिया जाधव वा.निरीक्षक,श्रीमती.वंदना खैरनार अनिल मोरे,भरत वाघ, एस .एस पवार श्रीमती.शोभा चौधरी यांचे ही फुल गुच्छ देऊन आभार व्यक्त केला.आता सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये महिलांना ५० टक्के दरात प्रवासाचा करता येणार असल्याबद्दल महिलांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांचे आभार व्यक्त केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा