Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे, धुळ्यात फटाके फोडून जल्लोष.....!!
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे, धुळ्यात फटाके फोडून जल्लोष.....!!
धुळे - जुन्या पेन्शन योजने बाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने धुळ्यातील राज्य सरकारी कर्मचार्यानी संप मागे घेत फटाके फोडत , नृत्य करत जलोष साजरा केला आहे.
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील एकोणावीस लाख सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता संपावर गेले होते. आठवडाभर कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालय ओस पडल्यासह, शासनाची कामे देखील खोळंबली होते. त्यामुळे राज्य शासनाची चांगलीच कोंडी झाली होती. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी संप मिटणार असल्याचं राज्य सरकारला स्पष्ट केलं होतं. त्याच अनुषंगाने राज्य सरकारच लक्ष वेधण्यासाठी धुळ्यातील कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारच्या आंदोलन करण्यात आली. याच आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेत अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय मान्य झाल्याने धुळ्यासह राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला आहे. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने राज्य सरकारची देखील आभार संपकरांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा