Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
जिह्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील विना परवाना वीटभट्या महसूल अधिका-याच्या वरदहस्ताने जोमात सुरुच...!
जिह्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील विना परवाना वीटभट्या महसूल अधिका-याच्या वरदहस्ताने जोमात सुरुच...!
शिरपूर प्रतिनिधी:-धुळे जिल्ह्यातील शिरपुर व शिंदखेडा तालुका म्हटला म्हणजे विविध्द्तेने नटलेला व गौण खणिजांचा संपन्न असा भूभाग.त्यातच त्या-त्या तालुक्यातील विकासपुरुषांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यात घतलेली भर.त्यामुळेच गावोगावी सर्वसामान्य जनतेपर्यत आपल्या कर्तूत्वाने पोहचलेली आपली ऒळख.यामुळे ही दोन्ही तालुके जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील महत्वाची व आघाडीचे तालुके म्हणुन ऒळखळे जातात.
मात्र,नोकरशाहीतील बेबंद अश्या महसूल अधिका-यांच्या त्यांच्या ----साठी,पर्यावरणाचा व मानवी जिवनाचा खेळ मांडलेला आहे.व हा खेळ नेमका केव्हा संपणार हा नागरिकांन समोर उभा असलेला प्रश्न आहे.
खेडो-पाडी,व वहातुकीच्या दृष्टीने सोयीस्कर होइल अश्या पध्दतीने गावापासून अगदी जवळच व नदी अथवा नाल्याच्या अगदी काठावर, मुख्य रस्त्यास लागून मोठ-मोठ्या वीटभट्या सुरु आहेत.या वीटभट्या शासनाच्या विविध स्तरावरील परवानग्या घेणे आवश्यक असते.तसेच या विटभट्यांना विटा बनविण्यासाठी लागणारा गाळाची अवश्यकता ते या नदी व नाल्यांच्या खोदकाम करुन भागवतात.महसूल अधिकारी देखील आपला लाक्षांक पुर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून गाळ रुपी गौण खनिजापोटी कर(रॉयल्टी) वसुल करते. आता नेमका मार्च एंन्डींग सुरु आहेच . त्यामुळे त्यांना आपला लाक्षांक पुर्ण करणे गरजेचे आहे.
महसूल अधिकारी यांचा आपला....
लाक्षांक पुर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र काम सुरु असेल.ज्यावेळेला तालुक्यातील हे महसूल अधिकारी यांच्याकडून रॉयल्टी वसुल करतात त्यावेळेस यांच्याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी आहे का नाही.
हे का तपासत नाही.निसर्गाने दिलेली देणगी व स्थानिक विकास पुरुषाच्या प्रयत्नाने आजही आबादित असेलेले पर्यावरण व गौण खणीज यांच्याशी बेकायदा उपद्रव करणा-या वीटाभट्टाधारकांवर तात्काळ गुन्हे का नोंदविले जात नाही ? पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत जात आहे.त्यांचा विपरित परिणाम हा मानवी जिवावर घातक असा परिणाम करित आहे.मग या मानवी जिवनाशी खेळणा-या वीटभट्टाधारक व्यक्तीना एखाद्या अंतकवादीप्रमाणे मोक्का का लावला जात नाही ?
शिरपूरकडून शिंदखेडा जातांना शिरपूर शहराच्या अगदी हकेच्या अंतरावरच अरुणावती नदीच्या कडेला खर्दे व शिंगावे गावाला लागून सुरु असलेल्या वीटभट्या,सुलवाडे गावाजवळ रस्त्याच्या कडेला लागून मोठ मोठ्या चिमण्या असलेल्या या वीटभट्या जेव्हा पेटविल्या जातात त्यावेळेस कितीतरी मोठ्या प्रमाणात पर्यावरणात कार्बनडाय ऑक्साईड सारखे मानवि जिवनास घातक घटक हे वातावरणात सोडले जातात.मग येथिल स्थानिक अधिकारी यांवर नेमकी कार्यवाही का करत नाही ? हे असे किती दिवस चालणार ? तरी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिका-यानी याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा जनतेचा आपल्यावरील विश्वास एकदा का उडाला तर त्याचे परिवसन विद्रोहाकडे जाईल,व पर्यावरणप्रेमीचा संताप त्यावेळेस अंगावर घेण्याची शक्ती आपल्याकडे नसेल.याबाबत यापुर्वी देखील तरुन गर्जना वृत्तसेवेतून हा सर्वसामान्य जनतेच्या जिवनाच्या आरोग्याचा प्रश्न घेऊन आम्ही बातमी प्रकाशित केलेली होती.मात्र याकडे कोणतीही दखल घेतलेली दिसून आलेली नसल्याने नागरिकाच्या आग्रहास्तव पुन्हा प्रकाशित करत आहोत.आता तरी याची दखल या अधिका-यांनी घेण्याची नितांत गरज आहे.व हेच वेळे आहे.त्यासच अगोदर सुचलेले शाहणपण म्हणता येईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा