Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
परिवहन अधिका-यांच्या अशिर्वादाने अनाधिकृत वहान विक्रेत्यांनी अखेर उभारली गुढ़ी ! तक्रारी नंतर परिवहन अधिका-यांनी केलेली चौकशी फ़सवी व केवळ देखावाच..?
परिवहन अधिका-यांच्या अशिर्वादाने अनाधिकृत वहान विक्रेत्यांनी अखेर उभारली गुढ़ी ! तक्रारी नंतर परिवहन अधिका-यांनी केलेली चौकशी फ़सवी व केवळ देखावाच..?
शिरपूर प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यात अनधिकृत पणे विनापरवाना टू व्हीलर विक्रेते यांचा मोठा सुळसुळाट झालेला असल्याने धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. त्यानुसार धुळे येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका कर्तव्य दक्ष अधिकारी सहा. मोटार वहान निरीक्षक अमोल मालुंजकर यांनी आपले कर्तव्य त्याच प्रमाणे पुर्ण केले जे त्यांच्या अधिका-यांना अपेक्षित होते, मात्र जनतेला तसे नको होते. जो पर्यत अश्या प्रकारच्या चौकशा होत राहतील, तो पर्यत अधानिकृत वहानविक्रेत्याची दसरा दिवाळी सोबत गुढी देखील उभारतील. यात तिळमात्र शंका नाही. ज्या अनाधिकृतपणे विना परवाना ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली सर्रास वाहान विक्रीचा गोरख धंदा करीत आहेत, केवळ शिरपुर शहरातील चार ते पाच अश्या शोरुम मध्ये दिवसा ढवळ्या भरगच्च वहाने विक्रीसाठी उभे असतांना चौकशी अधिका-यास केवळ एकच शोरुम दिसावे व त्यातही केवळ दोनच वहाने यास शोकांतिका म्हणावे की काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
चौकशी अधिकारी कोणत्या दिवसी येणार आहे, हे या अनाधिकृत वहान विक्रेत्यांना एक आठवाडा अगोदरपासून कसे काय माहिती होते..? केवळ वहान विक्रेतेच नव्हे तर एंजन्ट लोकांना तर अधिका-यांचे नाव देखील माहिती होते. मग कसे काय पोलिसाना चोर सापडतील. कारण चोरानाच खबर देण्यात आली होती, मी येण्यापुर्वी तु पळुन जाणे. आजपावतो पोलिसाचा खब-या ऐकले होते. मात्र चोरांचा खब-या हे ऐकून नागरिकांच्या मनात या अधिका-यांबाबत काय चित्र उभे राहिले असेल ते देव जाणो. म्हणजेच चौकशी अधिका-याने केलेली चौकशी केवळ देखाव्यापुरतीच फ़सवी होती. असेच नागरिकांचे मत आहे.
या विनापरवाना वाहान विक्री करण्यायांवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी. त्यावेळी त्यांच्या शोरूम मध्ये व गोडाऊन मध्ये असलेली सर्व वाहने जप्त करून ती वाहने त्यांनी कोठून जाणलीत त्याबाबत त्यांचा लेखी खुलासा घेऊन विनापरवाना धारकास वाहन विक्रीसाठी पुरवठा करणाऱ्या परवाना धारक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात यावा. व त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. ही अनाधिकृत टु व्हिलर वाहन विक्रीचा व्यवसाय कोणत्या वर्षापासून सुरु असून आजपावतो विकलेल्या वाहानांची यादी मिळवण्यात यावी. जेणे करून शासनाचा किती मोठ्याप्रमाणात जीएसटी कर बुडविला यांचे मोजमाप करणे सोपे जाईल व त्याबाबत जीएसटी विभागाला कळविता येईल.त्यामुळे जीएसटी अधिकारी हे दंडासह रक्कम वसुल करून शासन उत्पनात भर पडेल.तरी अश्याप्रकारे अनाधिकृतपणे विनापरवाना वाहान विक्री करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करून वेळीच चाप लावावा. अशी वहान धारक नागरिकांची मागणी आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा