Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री केंद्रावरील एस.एस.सी परीक्षा सुरळीतपने पार पाडल्याने केंद्र संचालक श्री एस.डी.साळुंखे सर यांचा सत्कार करण्यात आला.
साक्री केंद्रावरील एस.एस.सी परीक्षा सुरळीतपने पार पाडल्याने केंद्र संचालक श्री एस.डी.साळुंखे सर यांचा सत्कार करण्यात आला.
साक्री - मार्च २०२३ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस. एस. सी.) परीक्षा २ मार्चपासून तर २५ मार्चपर्यंत पार पडल्या. साक्री केंद्रावर संलग्नित १७ शाळांचे एकूण ९५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र संचालक तथा तामसवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. साळुंखे यांनी साक्री केंद्रावरील परीक्षेचे संचालन केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या परीक्षेत गैर मार्ग घडला नाही. तसेच इमारती बाहेरूनही पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार उद्भवला नाही.
४० वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा कमी एकूण ८६ पर्यवेक्षकांची नियुक्ती झाली होती. उपकेंद्र संचालक, अतिरिक्त पर्यवेक्षक, स्टेशनरी सुपरवायझर, लिपिक, शिपाई आदींच्याही परीक्षा कामी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. दहावी व बारावीचे एकाच दिवशी पेपर असल्याने दोन दिवस बैठक व्यवस्थेसाठी केंद्रावर साक्रीतील आदर्श माध्यमिक विद्यालय व गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल येथून अतिरिक्त बेंच उपलब्ध करण्यात आले होते.
परीक्षेत बसला 'कॉपी'ला आळा
यंदा बोर्डाच्या परीक्षेत नांदेड पॅटर्न राबविण्यात आल्याने साक्री केंद्रावर कॉपीला चांगलाच चाप लागला होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्रकल्प अधिकारी तृप्ती घोडमिसे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे या अधिकाऱ्यांनी परीक्षा काळात केंद्राला भेटी दिल्या तसेच प्रत्येक दिवशी कॉपी बहाद्दरांना नियंत्रित करण्यासाठी बैठे पथक नेमण्यात आले होते. त्यामुळे साखरी केंद्रावर परीक्षेवेळी 'कॉपी'ला आळा बसला.
केंद्र संचालक एन. एस. साळुंखे यांना के. डी. सोनवणे, संदीप सोनवणे व श्रीमती तारकेश्वरी निकम या तीन उपकेंद्र संचालकांनी परीक्षा संचलन करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्यासह एस. वाय. पाटील, जे. बी. मासुळे, वाय. यु. भामरे, एन. बी. सोनवणे यांनी बारकोड वाटप, उपस्थिती अनुपस्थिती अहवाल तयार करणे, विविध प्रपत्र भरून घेणे, प्रश्नपत्रिकांचा व उत्तरपत्रिकांचा हिशोब ठेवणे आदी कामांची जबाबदारी पार पाडली. आर. एल. बोरसे, डी. एन.पाटील, एल बी मोरे, पत्रकार जी. टी. मोहिते यांनी दक्षता समितीचे सदस्य म्हणून भूमिका पार पाडली. साक्री परिरक्षक कार्यालयाचे प्रमुख तथा ग.शि. राजेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. डी. खैरनार यांनी सहाय्यक परिरक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षा केंद्राला न्यू इंग्लिश स्कूल साक्रीचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी सहकार्य केले.
केंद्र संचालक एन एस साळुंखेंचा झाला सत्कार
एप्रिल अखेर निवृत्त होणारे तसेच ३३ वर्षांच्या सेवेत २२ वेळा केंद्र संचालक म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडलेल्या तामसवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा साक्री केंद्राचे केंद्र संचालक एन एस साळुंखे यांचा सर्व पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी आर. ए. पगारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षेचे अचूक नियोजन, केंद्रावर पूर्ण नियंत्रण तसेच परीक्षा कामाची जबाबदारी विभागून प्रत्येकाकडून उत्कृष्ट काम करून घेण्याची हातोटी म्हणून श्री साळुंखे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रजीत भामरे यांनी केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा