Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ मार्च, २०२३
साक्री राज्य परिवहन मंडळ येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा
आज रा.प.म.साक्री आगारात जागतिक महिला दिनानिमित्त साक्री आगारात मा.आगार व्यवस्थापक श्री.किशोरजी महाजन व वाहक सौ.माया संजय मोरे यांच्या प्रयत्नाने महिला दिनाचे कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम मातृत्व,कर्तृत्व,व नेतृत्वाला अनुसरुन होता.आजचा दिवस समस्त स्त्री जातीला वंदन करणारा होता.. प्रत्येक क्षेञातील स्त्री चा यामध्ये सहभाग होता... राजकारणापासून ते समाजकार्यात आपला ठसा उमटविणार्या स्त्री चा सहभाग होता... पाश्चात्य व पुरोगामी विचारांना डावलून भविष्याचा कडे वाटचाल करणार्या त्या नारीचा सहभाग होता.धन्य ती नारी जात धन्य ती माय माऊली जीने दाखवली दुनिया सारी खंरच आजचा कार्यक्रम वंदनीय,शोभनीय,व संस्कृती ला जपणारा ठरला.आगाराचे कर्तव्यदक्ष आगार व्यवस्थापक श्री.किशोरजी महाजन साहेब व लढावु व सतत न्यायासाठी झटणारी आगारातील रणरागिणी सौ.मायाताई मोरे यांना जाते..आगारात असंख्य स्त्री वर्ग असुन कार्यक्रमास अल्प उपस्थित राहिल्या हे तेवढ दुर्दैव ठरले.पण अश्या कार्यक्रमाचे आपण ही भाग व्हावे हे खंरच सुवर्णीय ठरते.महिला दिनानिमित्त आगार व्यवस्थापक व निसर्ग प्रेमी,तसेच ग्राहक व प्रवाशी मंच यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला व पार पाडण्यात आला.कार्यक्रम व कार्य काय असते ते सर्व अधिकारी वर्गाकडुन सर्व उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांना कळाले.आगारामार्फ़त व प्रवाशी व ग्राहक मंचामार्फत विविध श्रेञातील व आपल्या आगारातील सर्व महिलांचा सत्कार देखिल करण्यात आला.त्याचप्रमाणे सर्व क्षेञातील महिलांनी ही आदरणीय आगार व्यवस्थापक व सर्व अधिकार
यांचे आभार व्यक्त करत सत्कार देखिल करण्यात आला.महिला दिनानिमित्त, व्याख्याने,अध्यक्षिय भाषण झाले.. सर्वांच्याच बोलण्यातुन स्त्री हा समाजाचा केंद्रीय बिंदू आहे हे सिध्द झाले....जय जिजाऊ...जय शिवराय...
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा