Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी जितेंद्र पावरा यांची मागणी….
धुळे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी जितेंद्र पावरा यांची मागणी….
शिरपुर प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी अशी जितेंद्र पावरा - युवा कार्यकर्ता यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धुळे, जिल्हाधिकारी धुळे, यांना Email अर्जाद्वारे मागणी केली आहे....
निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये असे निर्दशनास येत आहे.
कि ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना अनेकदा कार्यालयात भेटत नाहीत त्यामुळे सर्व सामान्यांच्या कामाचा अणि वेळेचा खोळंबा होतो याला आवर करण्यासाठी आता कोकणातील ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी एका पत्राद्वारे राज्यातील
कोकण,पुणे,नाशिक,औरंगाबाद
अमरावती, नागपुर,विभागिय आयुक्तांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली लागु करण्याचे निर्देश दिले आहेत व प्रवेश द्वारावर जन माहीती अधिकारी फलक लावण्याबाबत सांगण्यात आले आहे.
तरी वरील संदर्भिय पत्राचा आशय लक्षात घेता आपल्या ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता येण्याच्या हेतूने व ग्रामसेवेकांच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी म्हणुन आपल्या ग्रामपंचातीमध्ये विनाविलंब बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी अशी मागणी जितेंद्र पावरा युवा कार्यकर्ता नवागांव यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा