Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
बालविवाहाला कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका - सीईओ भुवनेश्वरी एस. यांचे प्रतिपादन,
बालविवाहाला कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका - सीईओ भुवनेश्वरी एस. यांचे प्रतिपादन,
खंबाळे येथे मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर,शिरपूर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम
शिरपूर प्रतिनिधी : बालविवाहाला कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका. बालविवाह समाजाला लागलेली किड आहे. ती किड नष्ट करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. प्रतिबंधांसाठी 1098 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी खंबाळे येथे बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रमात केले.
मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर, शिरपूर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम खंबाळे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी 11 मार्च 2024 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटन धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.एन.पवार यांनी केले.कार्यक्रमात 8 वी व 9 वी च्या मुलींनी "बेटी हू मै बेटी" हे गीत सादर केले तसेच "आदिवासी नारे" या गितावर नृत्य सादर केले. विद्यार्थिनी सोबत सीईओ भुवनेश्वर यांनी देखील ठेका धरला व नृत्याचा आनंद घेतला. या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी बालविवाह समाजासाठी किती घातक असल्याचे मत मांडले.
गट विकास अधिकारी एस.टी.सोनवणे यांनी बालविवाहाचे तोटे यावर मार्गदर्शन केले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण व युनिसेफ जिल्हा समन्वयक नंदू जाधव यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम यावर व्हिडिओ व पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, श्रीमती अंजुबेन पटेल (इंग्लंड), समाज कल्याण सभापती कैलास पावरा (जि.प.धुळे), जि.प.सदस्य योगेश बादल, सरपंच सतीबाई आसाराम पावरा (खंबाळे), पोलीस पाटील, सुनील शिलदार पावरा (खंबाळे), विनेश हिरालाल पावरा (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), संजय रामदास कोळी, सुनील गंगाधर अग्रवाल, रणजीत आनंदा पाटील, भावसिंग कहाऱ्या पावरा, हिरालाल रघुनाथ कोळी, संजय गेंध्या पावरा, आनंदा आसाराम पावरा (ग्रामसेवक खंबाळे) उपस्थित होते.
कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सी.एन.पाटील यांनी दिली. त्यानंतर राज्यगीत व राष्ट्रगिताने समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.एन.पाटील यांनी तर आभार एम.जी.अहिरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सौ.पौर्णिमा पाठक, सौ.सुप्रिया पंतवैद्य,डॉ.श्वेता बेलगमवार, सुनील जैन, धीरज माळी, योगेश्वर माळी तसेच शिक्षक व्ही.एस.बेलदार, डी.ए.पावरा, एस.डी.पाटील, आर.यु.पवार, आर.एल. तवर, व्ही.एन.दोरीक, ए.बी.महाजन, एस.आर.जाधव, एम.के.पावरा, सी.बी.गुजराथी, चुनीलाल पावरा यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा