Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
रोजगार हमी योजने अंतर्गत अनुदानाच्या सिंचन विहिरीं हे भ्रष्टाचार्यांसाठी चराऊ कुरण आहे !
रोजगार हमी योजने अंतर्गत अनुदानाच्या सिंचन विहिरीं हे भ्रष्टाचार्यांसाठी चराऊ कुरण आहे !
धुळे तालुक्यात अनुदानाच्या सिंचन विहिरी हा विषय अधिकाऱ्यांना बेसुमार चराईचा विषय सतत वाटत असतो. या बाबत कितीही तक्रारी झाल्या,कितीही कारवाया झाल्या तरी निगरगट्टपणे नव्या भ्रष्ट्रचारासाठी नव्या जोमाने हे तयारच असतात.अनुदानाच्या सिंचन विहिरी हा तसा राज्यभर भ्रष्ट्राचारासाठी गाजणारा विषय आहे. फुलंब्री येथे एका सरपंचाने बीडीओ कार्यालया समोर लाखो रुपयांच्या नोटांची उधळण करीत संतप्त व अनोखे असे निषेध आंदोलन केले.आपल्या गावातील शेतकर्यांकडून अनुदानाच्या सिंचन विहिर प्रकरणासाठी बीडीओ पैसे मागत असल्याचा त्यांचा आरोप होता. नोटा उधळण्याची ही व्हिडिओ क्लिप राज्यभर प्रचंड व्हायरल झाली.राज्यभर नागरीकांत संतापाची लाट उसळली.परिणामी प्रशासनाची इज्जत पार धुळीस मिळाली. शासनाने त्या बीडीओचे तडकाफडकी निलंबन केले.धुळे तर यात माहिर आहे. धुळ्यात काय सुरु आहे ? धुळे तालुक्यात सन २०१७ पासून हा घोळ सुरु आहे. उद्दीष्टापेक्षा किती तरी अधिक प्रकरणे नोंदली गेली.जुन्याच विहिरींना नवीन दाखवून अनुदान उपटण्यात आले.काही शेतांमध्ये विहिरी न खणता भलत्याच विहीरीचे फोटो लावून केवळ कागदावर काल्पनिक प्रकरणे करण्यात आली. अनेक प्रकरणांतल्या विहिरीच चोरीस गेलेल्या आढळल्या.एक ना अनेक प्रकारे गायगोठा व सिंचन विहीर अनुदानाची नुसतीच लूट करण्यात आली.ओरड झाली. चौकशी झाली. मात्र पुन्हा कारवाईत दीर्घ टाळाटाळ होतच राहिली. प्रकरण खूप गाजत राहिले. तत्कालीन सीईओ वान्मती सी.या देखील टीकेच्या धनी ठरल्या.तीन तीन गटविकास अधिकार्यांना या रोहयो मधील कामांच्या चौकशीत सामोरे जावे लागले आहे.खरे तर अशा प्रकरणात दोषी कुणीही असो, त्याला घरीच पाठविले पाहिजे.पण आपली सिस्टिमच अशी आहे,की काहीही केले तरी कुणाचे काहीच वाकडे होत नाही. त्यामुळे नव - नवे भ्रष्ट्राचारी कलाकार समोर येतच राहतात.आता पुन्हा याच अनुदानाच्या सिंचन विहीर योजनेत भ्रष्ट्राचाराचा नवा एपिसोड समोर आला आहे.मागील भ्रष्ट्राचार प्रकरणांमुळे धुळे तालुक्यास अजुन नवीन उद्दीष्ट आलेले नाही.परंतु या योजनेसाठी अनधिकृतपणे फॉर्म छापण्यात आले. जि.प.प .स.सदस्यांना प्रत्येकी वीस फॉर्म देण्यात आले.काही ठिकाणाहून ओरड आली की केवळ हे फॉर्मच वीस हजार रुपयांना एक या दराने विकले जात आहेत. केवळ फॉर्मचे वीस हजार रुपये तर अनुदान मंजुरीसाठी वेगवेगळ्या स्तरावर किती वाटप करावे लागेल ? हा प्रश्न आपसुकच तयार होतो. या बाबत खूपच ओरड झाली.प्रश्नही विचारण्यात आले.जि.प.च्या स्थायी समितीतही प्रश्न उपस्थित झाला.शेवटी जि.प. मु.का.अ. बुवनेश्वरी एस. यांनी गट विकास अधिकारी आर.डी.वाघ यांच्या कडील कामाचा कार्यभार काढून घेवून त्याची प्रभारी जबाबदारी शिंदखेडा गट विकास अधिकारी यांच्याकडे सोपवून दिली. आधीच सिंचन विहिरींचे मोठे प्रकरण धुळ्यात गाजत आहे.त्यात शासनाने पुन्हा दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी आदेश काढला. मागेल त्याला सिंचन विहीर योजना जाहीर केली.अनुदानाची रक्कमही मोठ्या प्रमाणावर वाढविली.त्यामुळे जि.प. व प.स. यंत्रणेच्या तोंडाला पाणी सुटणे साहजिकच आहे. त्यामुळे केवळ धुळे - जळगाव - नंदुरबार - नगर - नाशिक जिल्हेच नव्हे तर राज्यभरात या यंत्रणा या योजनेकडे वखवखल्यागत लुटालुट करण्याची संधी म्हणून पाहात आहेत.धुळ्याचे उदाहरण तर आहेच. परंतु फुलंब्रीचे बीडीओ ऑफिस समोर नोटा उधळून निषेध करण्याचे प्रकरण यावर कळस आहे.क्लायमॅक्स आहे. प्रशासकीय यंत्रणेवरचा ठप्पा आहे. या मंडळींनी शरम नावाची गोष्ट कोळून प्यायले आहेत.त्यामुळे एखादा संतप्त शेतकरी ' आता हंटर घेवूनच अशा भ्रष्ट्राचार्यांच्या कार्यालयात गेले पाहिजे ! 'अशी प्रतिक्रिया देवू शकतो.तसे करता येत नाही.पण या निर्लज्ज लाचखोर भ्रष्ट्राचार्यांनी अशी वेळ आणली आहे.एवढे मात्र निश्चितपणे म्हणता येईल.पकडले गेले तरी नव्या जोमाने ' मुँह ' मारायला हे लाचखोर तयारच असतात. ही खरी शोकांतिका आहे !
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा