Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
बनावट ट्रक क्रमांक,बनावट चेसीस नंबर,बदलले आठ सीमकार्ड,पाच मोबाईल,बनावट फास्ट टॅग, बनावट ओळखपत्र वापरून बनवाबनवी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
बनावट ट्रक क्रमांक,बनावट चेसीस नंबर,बदलले आठ सीमकार्ड,पाच मोबाईल,बनावट फास्ट टॅग, बनावट ओळखपत्र वापरून बनवाबनवी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
अमळनेर : बनावट ट्रक क्रमांक,बनावट चेसीस नंबर,बदलले आठ सीमकार्ड, पाच मोबाईल,बनावट फास्ट टॅग, बनावट ओळखपत्र
वापरून बनवाबनवी
करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
करण्यात आली आहे.
त्यापैकी एकाने प्रेयसीला केलेला कॉल त्यांना गजाआड करण्यास पुरेसा ठरला.नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी (३१) आणि हारुन रशीद साजिदखान (३८,दोघे रा. जयपूर) अशी या बनवाबनवी करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी जोधपूर येथे विकलेल्या १८ लाख रुपयांच्या ३२५ साबण पेट्या जप्त केल्या आहेत.
राजस्थान येथील सुनील ओमप्रकाश भार्गव याने आपले नाव कैलास गुजर सांगून अमळनेर येथील कंपनीतून साबणाच्या ५६ लाख रुपये किमतीच्या पेट्या असलेला ट्रक भरला. त्यानंतर तो माल घेऊन गायब झाला होता. या गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्र स्वामी होता. स्वामी याने त्याचवेळी त्याच क्रमांकाचा ट्रक रावेर व इतर दोन ठिकाणांहून रवाना केले होते.त्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले होते,मात्र ज्या क्रमांकावरून चालक सुनील आधी बोलला त्याचे लोकेशन दुसरीकडेच येत होते. त्यामुळे एकाच क्रमांकाच्या वेगवेगळ्या गाड्या असल्याचा संशय आला.
त्यानंतर पोकॉ.नीलेश मोरे यांनी सिडीआर लोकेशनवरून स्वामीने २० सेकंद आपल्या प्रेयसीला कॉल केल्याचे शोधून काढले आणि मार्ग सापडला. प्रेयसीचा दुसरा संपर्क नंबर हुडकून काढण्यात आला परंतु तिने पोलिसाचा नंबर ब्लॉक केला.प्रेयसीचा बिकानेर येथील पत्ता शोधून माहिती काढण्यात आली तेंव्हा सुनील भार्गव याने कैलास गुजर हे नाव बदलले असल्याचे लक्षात आले.तो अनिल भार्गव आणि नरेंद्र स्वामी यांच्यासोबत मोठ्या चोऱ्या करत असल्याचे पोलिसांना समजले..
नीलेश मोरे यांनी सात दिवस आरोपीच्या घराबाहेर पहारा दिला पण उपयोग झाला नाही.शेवटी आरोपी स्वामी हा हैद्राबाद ते जयपूर रेल्वेने येणार असल्याची माहिती मिळाली. टी.सी.मदतीला धावला.माहिती मिळताच मोरे आरोपीच्या शेजारी जाऊन बसले.भिलवाडा स्टेशनवर तयार असलेल्या पथकाने स्वामीवर झडप घातली आणि त्याला पकडले. स्वामीने हारुन साजिदखान हा पण समाविष्ट असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भुसारे,भैयासाहेब देशमुख,हेकॉ. सुनील हटकर,कॉ.नीलेश मोरे,मिलिंद भामरे,उज्ज्वल पाटील यांच्या पथकासह शरद पाटील,श्रीराम पाटील, अमोल पाटील यांनी सहकार्य केले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा