Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३

शिरपूर शहरांसह तालुक्यात गुटखा विक्री सुरू ; नागरिकांची कारवाई करण्याची मागणी !!



शिरपूर प्रतिनिधी :-महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही तालुक्यात सर्रासपणे गुटख्याची विक्री होत आहे.
या खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाने कायमची बंदी घालावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अगदी सहज मिळत असलेल्या गुटख्याच्या आकर्षणामुळे महिलांसह अल्पवयीन मुले-मुली व विद्यार्थी ही त्याला बळी जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.


त्यामुळे शहरात गुटखा विक्री कोणामुळे सुरू आहे, याचा शोध घेण्याचीही मागणी होत आहे.शिरपुर शहरातील विक्रेत्यांमार्फत शहरात तालुक्यातील खेड्यापाड्यातील छोट्या मोठ्या दुकानदारांना विक्रीसाठी गुटखा पुरवला जात आहे.


मोटारसायकल,स्कूटरवर त्याची डिलिव्हरी केली जाते.यातून विक्रेत्यांना कोणाचीही भीती नसल्याचे स्पष्ट होते. म्हणून शहरांसाह तालुक्यातील प्रत्येक लहान मोठा दुकानदार खुलेआम गुटख्याची विक्री करताना दिसत आहे.एकीकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकन्यास मनाई दंड करण्याचा नियम मोडित छुप्या मार्गाने मिळणाऱ्या पुढ्या खाऊन थुंकीच्या पिचकाऱ्या मारण्याचे सूत्र सुरूच असल्याचे दिसत आहे.
यामुळे शहरातील जुना नवीन शासकीय इमारतीची दुरवस्था झाली आहे.
शाळकरी मुलेही व्यसनाधीन झाली आहेत गेल्या काही वर्षांत गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगत आहे.
त्यामुळे तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मात्र,पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे.शाळेच्या परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक टपऱ्या, दुकानांत गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.लहान मुले खाऊच्या पैश्यांनी गुटखा विकत घेत आहेत.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याचे मत नागरिकांनी नोंदवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध