Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

महावीर जन्म कल्याणक निमित्त दोंडाईचा जैन समाजा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन... हेलमेट सहीत दुचाकी रॅली ठरली मुख्य आकर्षण...



दोंडाईचा प्रतिनिधी - दरवर्षी च्या परंपरेप्रमाणे यंदाही भगवान महावीरांचा जन्म कल्याणक महोत्सव दिवस तप-त्याग सहीत धर्ममय वातावरण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यामुळे जैन बांधवांनी आपली दुकाने दिवस भर बंद ठेउन कार्यक्रमात सहभाग घेतला.


धार्मिक अनुष्ठान म्हणून २४ तास अखंड नवकार मंत्र जप करण्यात आला, त्यात ३०० पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवला.२७५ तपस्वींनी एकासन,बियासन,शआयंबिल आदि तप कले.

सकल संघाची सामुहिक सामाइक आयोजित करण्याचा यावर्षी पहिल्यांदाच प्रयत्न करण्यात आला. तो ही ३४० जणांनी उपस्थित होउन सामुहिक आराधना करुन यशस्वी केला.

भगवान महावीराच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा मिरवणुक काढण्यात आली. जैन मंदिर,अहिंसा चौक मध्ये सुरुवात होउन शहरातील मुख्य बाजारपेठ आणि राजपथ मार्गे दादावाड़ी येथे समारोप झाला.

"अहिंसा परमो धर्म" आणि "जिओ और जीने दो" चा संदेश देत काढण्यात आलेली दुचाकी रॅली यंदाचे विशेष आकर्षण ठरली. यात जवळपास १०० दुचाकीस्वारांनी हेलमेट घालून सहभाग नोंदवला आणि अपघातावेळी जीवितास हानी होउ नये यासाठी सुरक्षा कवच म्हणून हेलमेट चा वापर करावा असा संदेश दिला. हे कार्यक्रम पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत संपन्न झाले. बाइक रॅली मध्ये हेलमेट घालून समाजाला संदेश दिल्याबद्दल पोनि श्रीराम पवार यांनी युवकांचे विशेष अभिनंदन करत आभार मानले.

दुपारी लहानांसाठी आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ६ ते १६ वयोगटातल्या ३० मुलामुलींनी भाग घेउन विविध पात्र साकारून धार्मिक आणि सामाजिक संदेश दिला. रात्री महिलांसाठी धार्मिक अंताक्षरी चे आयोजन केले गेले. ५० महिलांनी यावेळी विविध भक्ती गीत सादर केले. दोन्ही स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री हेमंत देशमुख, आमदार जयकुमार रावल यांच्या सहीत नगरसेवक बंधु आणि पत्रकार संघाच्या सदस्यांनी उपस्थित राहुन सर्व जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.

सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जैन सकल संघा चे अध्यक्ष धर्मचंद बोथरा, सर्व पदाधिकारी आणि वरीष्टांसहीत जैन ड्युड्स फ्रेंड सर्कल चे अध्यक्ष शैलेश बोथरा, उपाध्यक्ष मयुर पारख, सचिव तेजस रूणवाल, खजिनदार चेतन सोलंकी यांच्या सहीत सर्व सदस्यानी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध