Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ तर्फे श्री राजकपूर मराठे यांना आदर्श सरपंच पुरस्कार..
महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ तर्फे श्री राजकपूर मराठे यांना आदर्श सरपंच पुरस्कार..
शिरपूर शिरपूर प्रतिनिधी: विजय महाले:-तालुक्यातील उंटावद येथील उपसरपंच व माजी कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर चे संचालक तसेच विविध कार्यकारी सोसायटी संचालक श्री राजकपूर किसनराव मराठे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ तर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते सरपंच सेवा संघातर्फे आदर्श सरपंच पुरस्कार माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर येथे देण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सरपंच सेवा संघाचे संस्थापक सरपंच चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे उपस्थित होते प्रमुख अतिथी आदर्श सरपंच तथा जिल्हाध्यक्ष संजय काळे सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे मानव अधिकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गिरी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून फुलहार अर्पण करण्यात आले व दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले पुरस्कार सोडल्यास उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
सरपंच नेहमी गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा असावा व्यक्तिगत हिताच्या पलीकडे कार्य करणारा प्रामाणिकपणे काम करणारा असावा आणि तळमळीने पोट तिडकेने स्वतःच्या आयुष्याच्या सारा वेळ आपल्या गावाच्या विकासासाठी देणारा सरपंच असावा अशा सरपंचाचीच निवड सरपंच सेवा संघातर्फे होत
असते आणि त्यांच्या सन्मान व कार्यक्रमातून केला जाणार असा सूर मनोगत तून व्यक्त झाला उंटावद तालुका शिरपूर येथील उपसरपंच राजकपूर मराठे यांनी जेव्हापासून उपसरपंच पदाचे धुरा सांभाळले तेव्हापासून त्यांनी एकच ध्यास गावाचा विकास आपले जीवनाचे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास साधला गावातील लोकांना संघटित करून आपल्या गावाच्या विकास साधण्याचा प्रयत्न केला गावात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करून तळागाळापर्यंत त्यांना लाभ पोहोचविला गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण मिनरल वॉटर योजना गावठाण विकास घरकुल योजना ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन इमारत गावातील तरुणांना व व्यायाम शाळा भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला नको यासाठी पिण्याच्या पाण्याची हजारो लिटर क्षमता असलेली टाकी जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे बांधकाम शाळेला कंपाऊंड व क्रीडा क्षेत्रासाठी गावातील मुलांना पटांगण उपलब्ध करून दिले गावात विविध सामाजिक कार्य उपस्थित राहणे तसेच गावात तंटे निर्माण न करता बिनविरोध ग्रामपंचायत करणे ही ही कामे पाहून त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कारासाठी त्यांचे नाव घोषित केले वरील पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार कार्यकारी संपादक निलेश कुमार पावशे राज्य संघटक रवींद्र पवार राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे राज्य समन्वय देविदास फापाळे आदींनी परिश्रम घेतले.
श्री राजकपूर मराठे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ तर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीश भाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे जी.प .उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच उंटावद ग्रामस्थ व शिरपूर तालुक्यातून त्यांना अभिनंदन व शुभेच्छांच्या वर्षाव केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा