Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद......!! महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना.....!!
धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद......!! महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना.....!!
धुळे - धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदान ला सुरुवात झाली. या निवडणुकीकरिता मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहावयास मिळाला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना होत असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळ्यात भाजपा खासदार डॉ.सुभाष भामरे व काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांची तर दोंडाईचा मध्ये माजी मंत्री जयकुमार रावल व माजी मंत्री हेमंत देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. धुळ्यात 16 जागांसाठी 39 उमेदवार तर दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या 16 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात आहे. या अगोदर दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन सदस्य बिनविरोध झाले आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची मत मोजणी 30 एप्रिल तर दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतमोजणी 29 एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारते हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका केल्याचे दिसून आले.या निवडणुकीत मतदार फुटू नये यासाठी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मतदारांची वाहने मतदान केंद्रापर्यंत आणून मतदार उतरवले जात होते. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. या मतदानाकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. अनेक वर्षांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता होती. तर दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप सत्ताधारी पक्ष होता. आता या होणाऱ्या निवडणुकीत दोन्हीही पक्ष सत्ता राखणार की परिवर्तन होणार हे आता मतदार राजाच ठरवणार आहे .
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा