Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेतकरी विकास पॅनलला साक्री तालुक्यातील सर्वच स्तरावरून मिळणाऱ्या समर्थनाने विजयाचा मार्ग सुकर होणार - आमदार मंजुळा गावित
शेतकरी विकास पॅनलला साक्री तालुक्यातील सर्वच स्तरावरून मिळणाऱ्या समर्थनाने विजयाचा मार्ग सुकर होणार - आमदार मंजुळा गावित
साक्री तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 2023 ऐन उन्हाळ्यात चांगलीच तापलेली आहे या निवडणुकीत यावेळी दोन गट समोरासमोर विरोधात लढत आहेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचा बळीराजा पॅनल या नावाने स्वतंत्र पॅनल आहे आणि तालुक्यातील भाजप नेते सुरेश रामराव पाटील व विद्यमान आमदार मंजुळाताई गावित यांचा शेतकरी विकास पॅनल नावाने स्वतंत्र पॅनल आहे यावेळी साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र तालुक्यातील अनेक पक्ष उमेदवारांनी शेतकरी विकास पॅनलने मंजुळा गावित व आबासाहेब सुरेश पाटील यांच्या माध्यमातून शेतकरी विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे साक्री तालुक्यातील भाजप,शिंदे गट काँग्रेस,राष्ट्रवादी व इतर अनेक छोट्या-मोठ्या पक्षांचे मोठे समर्थन मिळाले आहे त्यामुळे साक्री तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे पारडे जड दिसते आहे तसेच काल झालेल्या साक्री येथील सुमंगल लॉन्स येथील मेळाव्यात जमलेल्या मतदारांच्या लोकसंख्येवरून विजयाची प्रचिती आली आहे तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून आमदार मंजुळा गावित व सुरेश रामराव पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला की यापूर्वी साक्री तालुक्यात अनेक सहकारी संस्था कार्यरत होत्या सहकारी साखर कारखाना देखील होता मात्र विरोधकांनी या सगळ्या संस्था बंद पाडून आपला आर्थिक हेतू साध्य केलेला आहे हे गेल्या दोन पंचवार्षिक हे लोक धुळे जि.प.चे अध्यक्ष होते मात्र निवळ ठेकेदार पोसण्यात आणि त्यांच्याकडून कमिशन घेण्यात यांनी आपला कार्यकाळ संपवला व स्वतःचे प्लांट उभारून साक्री तालुक्यात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करून लोकांचा जीवाशी खेळ केला मात्र जनता पुन्हा अशा लोकांना निवडून देणार नाही हे सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळे जनता जनार्दन मतदान करताना या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मतदान करेल शेतकरी विकास पॅनलचा पारड्यात आपले मतदान टाकेल आणि साक्री तालुक्याच्या राजकारणात यावेळी एक वेगळाच समीकरण पाहावयास मिळेल हे मात्र नक्की यापूर्वी देखील साक्री तालुक्यात जव्हार आणि अँकर हे दोन गट अस्तित्वात होते आणि त्याचीच प्रचिती पुन्हा साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून दिसून येत आहे असे म्हणायला हरकत नाही आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात विद्यमान दोन्ही गटांचे वरिष्ठ नेत्यांची संबंध आहेत त्यात बळीराजा पॅनल ची शिरपूरचे आमदार अमरीश भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तर शेतकरी विकास पॅनल ही रचना विद्यमान मंत्री विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत मात्र यावेळी शेतकरी विकास पॅनल कडून आपली प्रतिष्ठापनाला लावली आहे त्यात काटवांचे जनसेवक मंगेश नेरे मालपुरचे उद्योजक रावसाहेब भामरे यांच्यासारखे लोकप्रिय व मातब्बर सर्वच उमेदवार अत्यंत प्रभावी पणे काम करणारे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या पॅनल साक्री तालुक्यात विजयी होईल असा अंदाज लावला जात आहे या निवडणूक अनेक तालुक्यातील नेत्यांचे समर्थन मिळालेले आहे त्यात मुख्यत्वे मोहन सूर्यवंशी शैलेंद्र आजगे सुरेश सोनवणे पोपटराव सोनवणे नरेंद्र मराठे पंकज मराठी व्हिडिओ सोनवणे उत्तमराव देसले खंडू कुवर व संघर्ष रमेश बंडू गोकुळ परदेशी सुमित नागरे विजय भामरे चंदू आबा देवरे सचिन सोनवणे धीरज देसले अमोल सोनवणे भूषण वाणी रावसाहेब गांगुर्डे राजधर देसले नयनेश भामरे भूषण ठाकरे पंकज भामरे रुपेश नांद्रे दीपक काकुस्ते प्रदीप कोठावदे कोतकर प्रवीण राणे ताहीर बेग मिर्झा मनोज मुजगे काशिनाथ चौरे नितीन गायकवाड बंडू नांद्रे शांताराम अहिरे यांच्यासारख्या तालुक्यातील अनेक स्थानिक नेत्यांनी शेतकरी विकास पॅनलला आपला पाठिंबा स्पष्टपणे दर्शवलेला आहे यातून असे दिसून येते की शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा विजय हा निश्चितच होणार असे दिसून येत आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा