Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

नंदुरबार येथील छत्रपती मल्टी स्पेशल हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या एकदिवसीय शिवकथेचे आयोजन...



नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार येथील छत्रपती मल्टी स्पेशल हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या एकदिवसीय शिवकथेचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह अर्धा डझन मंत्री उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे 22 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ते बनविणे, वाहतूक व्यवस्था करण्यापासून पायाभूत सुविधा उभारण्यापर्यंतची तयारी युद्धपातळीवर जोरात सुरू करण्यात आली आहे.


या संदर्भात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवार,१६ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत सोहळ्याची माहिती देताना सांगितले की, चार वर्षांपूर्वी जनतेच्या आशीर्वादाने मी एका मोठ्या आजारातून वाचलो आणि उभा राहू शकलो.त्यामुळेच त्याचवेळी रघुवंशी कुटुंबीयांच्या मदतीने नंदुरबारमध्ये सर्वात मोठ्या आजारांवर उपचार करणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा ठराव घेण्यात आला होता, तो आता पूर्ण झाला आहे.

सोबतच नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून सभामंडप नावाने नंदुरबार शहरातील सुमारे ५१ शिवमंदिरे बांधण्याचे काम आपण यापूर्वीच केले असून, येथे शिवकथा व्हावी, अशी पूज्य मिश्राजींचीही इच्छा होती.श्रध्देय मिश्रा जी यांनी आमची विनंती मान्य केली त्यामुळे नंदुरबारच्या लोकांना कथेचा फायदा होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध