Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

राज्य उत्पादन शुल्क शिरपूर विभाग यांची दमदार कामगिरी



शिरपूर प्रतिनिधी:- मा.डॉ.विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र, मा.श्री.सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र, मा.श्री.अर्जुन ओहोळ साहेब विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, मा.श्री. मनोज शेवरे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली
मा.निरीक्षक श्री.एस.एस.हांडे राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर ता.शिरपूर जि.धुळे यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, एक चार चाकी वाहना मधून बोराडी माल्कात्तर रस्त्यावर बोराडी गावात ता.शिरपूर जि.धुळे वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली नुसार दिनांक १८/०४/२०२३ रोजी पाहटे ०४ वाजता बोराडी माल्कात्तर रस्त्यावर बोराडी गावात ता.शिरपूर जि.धुळे येथे सापळा रचून थांबलो असता सीमा तपासणी नाका हाडाखेड व भ.प.धुळे यांनी समोरून संशयित वाहन क्र. MH१८ BG ५८१९ हे येत असल्याचे दिसले त्यास थांबविण्याच्या इशारा केला असता.सदर वाहनाच्या वाहनचालकाने सदर वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.सदर वाहनाची तपासणी केली असता.प्रथम दर्शनी सुक्या चाऱ्याच्या गोण्या दिसून आल्या सदरच्या गोण्या बाजूला करून वाहनात सखोल तपासणी केली असता सदर वाहना मध्ये माउंट बिअर ५०० मी.लि.क्ष.महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या ,मध्यप्रदेश राज्यात निर्मिती व विक्री करिता असलेले एकूण १४४० टीन मिळाले व रॉयल ब्ल्यू व्हिस्की १८० मी.लि.क्ष.च्या एकूण १९२० बाटल्या असे एकूण चार चाकी वाहनासह एकूण रु.९,४१,६००/- अंदाजे किंमतीचा मुद्देमाल दारूबंदी गु.र.नं.५०/२०२३ दिनांक १८/०४/२०२३ नुसार गुन्हा नोंद करून सदर वाहनावर फरार चालक,मालक,
यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई एस.एस.हांडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. शिरपूर विभाग शिरपूर,सागर चव्हाण, गणेश जाधव, दुय्यम निरीक्षक, एस.एस.गोवेकर स.दु.नि व जवान सर्व शांतीलाल देवरे गोरख पाटील केतन जाधव,प्रशांत बोरसे, हेमंत पाटील, मनोज धुळेकर के.एम.गोसावी, दारासिंग पावारा ,तसेच वाहन चालक, रवींद्र देसले,निलेश मोरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास एस.एस.हांडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क शिरपूर विभाग शिरपूर ता.शिरपूर,जि.धुळे, हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध