Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ एप्रिल, २०२३

धुळे बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकासची वज्रमुठ घट्ट भाजपाने शेतकर्‍यांना उध्वस्त केले -माजी मंत्री बाळासाहेब थोरात शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल-आ.कुणाल पाटील



धुळे- धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वात होती म्हणूनच धुळे बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल आहे.त्यामुळे आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलमागे मतदारांनी खंबीरपणे उभे रहावे. भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कायदे करुन बाजार समित्या आणि शेतकर्‍यांना संपविण्याचे काम चालविले आहे.भाजपाच्या कृषीविरोधी धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. गारपीठ,अवकाळी,वादळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना अद्यापही राज्यातील भाजप-शिंदे सरकारने शेतकर्‍यांना मदत जाहिर केली नाही. म्हणून धुळे बाजार समितीच्या निवडणूकीत विरोधी भाजपाच्या पॅनलला त्यांची जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने एकतेची वज्रमुठ घट्ट केली आहे, आजची प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या मतदारांची सभा ही विजयाची मुहूर्तमेढ रोवणारीच असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य विधीमंडळ पक्षनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. दरम्यान शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल महाविकास आघाडीकडून दिले जाईल त्यामुळे मतदारांना महाविकासच्या पाठीमागे उभे रहावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले.


धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीचा आज दि.9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वा.मतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नकाणे ता.धुळे येथील दुलारी गार्डन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला काँग्रेसचे राज्य विधीमंडळ पक्षनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, आ.कुणाल पाटील,माजी आ.प्रा.शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.प्रारंभी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि,धुळे बाजार समिती ही महाराष्ट्रातील अव्वल बाजार समिती आहे. बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या तालुक्यात शेतकर्‍यांसाठी उपबाजार समित्याही सुरु करणार होतो.गुरांचा बाजार मोठा असल्याने गुरांच्या शेणापासून प्रक्रीया उद्योग उभारण्याचा संकल्प होता.मात्र राज्यात सरकार बदलल्याने सर्वच योजनांना अडविण्याचे काम त्यांनी केले.मात्र यापुढे शेतकरी आणि व्यापारी,हमाल मापाडीच्या संकल्पनेतील उत्तम बाजार समिती घडविण्याचे काम केले जाईल. बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असणारे आणि शेतकर्‍यांचा विचार करणारेच उमेदवार उभे करणार असल्याची ग्वाही आ.पाटील यांनी यावेळी दिली.म्हणून मतदारांनी महाविकास आघाडीच्या पॅनलला विजयी करावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले.
मेळाव्याच्या शेवटी मार्गदर्शन करतांना विधीमंडळ काँग्रेस पक्ष नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले कि,धुळे बाजार समिती माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली असल्याने ही बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची आहे. केंद्रातील भाजप सरकारने तीन काळे कृषी कायदे केले होते त्यामुळे शेतकर्‍यांना दिर्घकाळ आंदोलन करावे लागले या आंदोलनात तब्बल 700 शेतकर्‍यांचा बळी गेला.शेतकरी विरोधी धोरण राबवून भाजपा सरकार शेतकरी आणि बाजार समित्या उध्वस्त करण्याचे काम करीत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. आज शेतकरी गारपीठ, अवकाळी-वादळी पावसाच्या सकंटात सापडला आहे. तरीही भाजप-शिंदे सरकारने कोणतीही मदत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जाहिर केली नाही.त्यामुळे शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. विधीमंडळात आ.कुणाल पाटील आणि आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठविला, आज कांदा,कपाशी पिकाला भाव नाही. दुर्दैवाने गेल्या सात महिन्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. म्हणून शेतकर्‍यांनी धुळे बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपाच्या पॅनलला जागा दाखविणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहण्याचेा आवाहन विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
मेळाव्याच्या प्रारंभी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेले शेतकरी,अपघाताने मृत पावलेले शेतकरी, शहीद जवान आणि ज्ञात अज्ञात मृत्यू पावलेल्या बांधवांना सामुदायिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्यात माजी आ.प्रा.शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिवसेनेचे नेते महेश मिस्त्री, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेसचे राज्य विधीमंडळ पक्षनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील,आ.कुणाल पाटील,माजी आ.प्रा.शरद पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य किरण पाटील,शिवसेना(उबाठा) अतुलभाऊ सोनवणे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिवसेना (उबाठा)नेते महेश मिस्त्री, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे,सौ.लताताई पाटील,सौ.अश्‍विनीताई कुणाल पाटील,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले, जोसेफ मलबारी,गुलाबराव कोतेकर,बाजीराव पाटील,डॉ.दरबारसिंग गिरासे,भगवान गर्दे,साहेबराव खैरनार,खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील,कृषीभूषण भिका पाटील,डॉ.ममताताई पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, शिवसेना(उबाठा) शुभांगीताई पाटील,डॉ.अनिल भामरे,मुकटी येथील पंढरीनाथ पाटील,रितेश पाटील,विशाल सैंदाणे, सरपंच आशाताई मधुकर गर्दे, गुणवंत देवरे, माजी पं.स.सदस्य परशराम देवरे, आप्पा खताळ,गंगाराम कोळेकर, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील,डॉ.संदिप पाटील,नाना शिंदे आर्वी,वसंत पाटील,शिवसेनेचे(उबाठा)कैलास पाटील, नाना वाघ,गुलाबराव पाटील,डॉ.दत्ता परदेशी, दिलीप शिंदे,रमेश श्रीखंडे,रविंद्र देवरे,एन.डी.पाटील,विजय देवरे, प्रदिप देसले,बळीराम राठोड,महादू गवळी बोरविहीर, बाबा माळी मोघण, शिरीष सोनवणे,बापू खैरनार,ऋषी ठाकरे मोराणे, प्रशांत भदाणे नगाव, माधवराव पाटील नंदाळे, अशोक सुडके कुंडाणे,छोटू चौधरी, जि.प.सदस्य अरुण पाटील,के.डी.पाटील, संतोष पाटील,दिनकर पाटील,दिनेश पाटील मेहेरगाव,रावसाहेब पाटील यांच्यासह बाजार समीतीचे सर्व मतदार, शेतकरी बांधव,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन जगदिश देवपुरकर यांनी केले तर आभार माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी मानले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध