Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
विष मुक्त शेती काळाची गरज आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना पी.एम.बायोटेकची उत्पादने हाच एकमेव पर्याय
विष मुक्त शेती काळाची गरज आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना पी.एम.बायोटेकची उत्पादने हाच एकमेव पर्याय
आजघडीला परिस्थिती पाहता विष मुक्त शेतीची गरज असल्याचे चित्र आहे. याचे पहिले कारण आहे आर्थिक आणि दुसरे आहे ते आरोग्याचे.
गांडुळांकडे सर्रास दुर्लक्ष : रासायनिक खतांच्या वापराने शेतातल्या गांडुळांची संख्या कमी होते. गांडूळ हा शेतकर्यांचा मित्र असतो असे परंपरेने सांगितले जाते मात्र त्याकडे मधल्या काळात दुर्लक्ष झाले. परंतु गांडूळ शेतकर्यांचा मित्र असतो. या म्हणण्यात फार मोठा आशय सामावलेला आहे.
...आणि पिकांची वाढ चांगली होते : गांडूळ शेतातली माती भुसभुशीत करतो आणि शेत नांगरण्याचे खर्च वाचवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जमीन भुसभुशीत केली की पिकांच्या मुळांची मातीत होणारी हालचाल सोपी जाते आणि मुळे सहजतेने जमिनीत खोलवर जाऊन अन्न आणि पाणी शोषून घेतात.मुळे जेव्हा असे अन्नपाण्याचे शोषण करतात तेव्हा पिकांची वाढ चांगली होते. म्हणजे गांडूळामुळे पिक चांगले येते
रोगजंतूंचाही फडशा : गांडूळांना डोळे नसल्यामुळे ते स्पर्श होईल ते खात राहतात आणि खातात खाता मातीच्या आतील रोगजंतूंचाही फडशा पाडतात. त्यामुळे पिकांवर रोग कमी पडतात आणि महागडी औषधे आणून फवारण्याची गरज लागत नाही. म्हणजे गांडूळामुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्च वाचतो.
पैसे वाचतात : सेंद्रिय शेतीतला गांडूळ हा महत्त्वाचा घटक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय खते तयार करताना शेतातल्या काडीकचर्याचा वापर केला जातो. तो काडीकचरा एरवी वाया जात असतो. परंतु त्यांचाच खत म्हणून वापर केल्यास रासायनिक खते विकत आणण्याची गरज भासत नाही आणि शेतकर्यांचे पैसे वाचतात.
गांडूळ फुकटचा कारखानदार : गांडूळाच्या पोटात एक विशिष्ट प्रकारची भट्टी आहे. त्या भट्टीतून त्याने खाल्लेल्या मातीत नत्र मिसळले जाते. म्हणजे गांडूळ हा युरियाचा पुरवठा करणारा फुकटचा कारखानदारसुध्दा असतो. त्यातूनही शेतकर्यांचे पैसे वाचतात.
उत्पादने विषमुक्त : अलीकडच्या काळात रासायनिक खतांचे परिणाम लक्षात यायला लागले आहेत आणि म्हणूनच रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतल्या मालाला लोकांची मागणी यायला लागली आहे. कारण सेंद्रिय शेतीतली उत्पादने विषमुक्त असतात. हे लोकांच्या लक्षात आले आहे. याही दृष्टीने सेंद्रिय शेती आपल्या हिताची ठरणार आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा