Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

साक्री तालुका भाजपच्या वतीने साक्री शहरात स्वातंत्र्यविर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन होय आम्ही सारे सावरकर या घोषणेने साक्री शहर दुमदुमले



आज दि.8/4/2023 रोजी साक्री तालुका भाजपच्या वतीने साक्री शहरात स्वतंत्रवीर वि.दा.सावरकर गौरव यात्रेचे आयोनज करण्यात आले साक्री शहरात भाजप कार्यालया पासून
या गौरव यात्रेची सुरुवात करण्यात आली व संपूर्ण शहरात मोठ्या संख्येने भाजपचा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली.तसेच सावरकरांचा नावाने विविध घोषणा देऊन होय आम्ही सारे सावरकर आशा आशयाचे पोस्टर बॅनर लावण्यात आले. भारताच्या स्वतंत्र लढ्यात वि.दा. सावरकरांचे मोठे योगदान आहे आणि अशा थोर स्वातंत्र्य विराचा कुणी राजकीय पक्षाचे प्रमुख वादग्रस्थ विधान करीत असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो स्वातंत्र्य वीर सावरकर हे आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचा आदर झालाच पाहिजे त्यांचा अवमान म्हणजे देशाचा आवमन आहे.जो कुणी स्वातंत्रवीर सावरकरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे काम करीत असेल तर ते देश हिता विरोधी काम आहे असे म्हणत सावरकरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा भापचे उप अध्यक्ष तसेच विद्या विकास मंडळ साक्री चे अध्यक्ष श्री चंद्रजित सुरेश पाटील व साक्री विधानसभेचे भाजपचे भावी आमदार इंजि.मोहन सूर्यवंशी यांनी केले.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती खा.हिना विजयकुमार गावित यांनीही दिली यावेळी साक्री तालुका भाजपचे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी श्री.वेडू अण्णा सोनवणे,प्रदीप नांद्रे,राकेश दहिते,राकेश अहिरराव,दिपक काकुस्ते,स्वप्निल भावसार, विनोद पगारिया,कुंदन देवरे,चंद्रकांत पवार,बापु गीते,शैलेंद्र आजगे,केे.टी.सूर्यवंशी, वसंत घरटे,पंकज हिरे,योगेश भामरे,योगेश चौधरी,विश्वास पवार,संजय अहिरराव,मुकुंद बोरसे,रोहित पवार,उत्पन्न नांद्रे,विजय ठाकरे, तसेच शिवसेना (शिंदे) गटाचे जयेश नागरे 
व त्यांचे सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी मोट्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध