Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

गुन्हेगारांचा कर्दनकाळ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार दोंडाईचात दाखल...



दोंडाईचा प्रतिनिधी दोंडाईचा येथे नव्याने बदलून आलेले पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी चार्ज हाती घेतल्यानंतर सट्टा,भांग,गांजा जुगार, गुटखा,विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली असून अवैध धंदे पूर्णपणे बंद झालेले दिसून येत आहे.त्यामुळे शहरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

दोंडाईचा शहर धुळे जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर असून मिरचीची मोठी बाजारपेठ जवळपास 50 खेड्यांचा संपर्क शहराशी येत असतो.राजकीय दृष्टिकोनातून देखील या शहराला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. रावल गट व देशमुख गटाचा संघर्ष राजकारणात नेहमी जनतेला बघायला मिळत असतो. त्यामुळे येथे शासकीय अधिकाऱ्यांना देखील काम करताना तारेवरची कसरत करावी लागत असते. नव्याने आलेले पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

शहरातील वाढत्या चोऱ्या,वाढती लोकसंख्या अपूर्ण संख्या बळ असल्याने जनतेने देखील आपापल्या मालमत्तेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाहेरगावी जाताना घराशेजारी लोकांना लक्ष ठेवण्यास सांगावे घरामध्ये सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम ठेवण्यासाठी बँक लॉकरचा वापर करावा किंवा नातेवाईकांकडे ठेवण्यास द्यावे. बाहेरगावी जाताना घराच्या दरवाजे खिडक्या व्यवस्थितपणे बंद करावे शक्यतो जवळच्या नातेवाईकांना घरी झोपण्यास सांगावे कॉलनी परिसरात सेल्समन फेरीवाले यांच्याकडून खरेदी करताना सावधगिरी बाळगावी शक्यतो.स्टेशन भागातील व कॉलनी परिसरातील दुकानदार व रहिवासी यांनी रात्रीचा गस्तीसाठी पहारेकरी नेमावा. सोन्याचे दागिने साफ करून देतो किंवा नवीन बनवून देतो अशी बतावणी करणाऱ्या पासून सावधगिरी बाळगावी. भाडेकरू ठेवताना ओळखपत्र व संपूर्ण शहानिशा करून भाडेकरू ठेवावे असे श्री पवार यांनी शेवटी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध