Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ एप्रिल, २०२३
दहिवद येथील रेशन दुकाने हायकोर्टाच्या आदेशाने पुन्हा रद्द
दहिवद येथील रेशन दुकाने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द करण्यात आली .स्वस्त धान्य दुकानदार रमेश काशिनाथ पाटील व कोकिळाबाई वासुदेव माळी यांची ती दुकाने होती.
दहिवद येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील व ग्रामस्थांच्या आमरण उपोषण व तक्रारीं नुसार सन २०१६ मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल पवार यांच्या आदेशाने संबधित दुकाने रद्द झाली होती.जिल्हापुरवठा अधिकारी व उपआयुक्त यांच्या निकालाला स्थगिती देत तत्कालीन मंत्री गिरीष बापट यांनी त्यांना पुन्हा दुकाने चालवण्यास परवानगी दिली होती.तत्कालीन मंत्री यांच्या निर्णयाविरोधात तक्रारदार पंकज पाटील यांनी उच्च न्यायालयात अपिल करून दुकाने रद्द केली होती.
सन २०१६ ते २०२२ पर्यंत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याकारणाने विधी अधिकारी जळगांव यांच्या मार्गदर्शनाने जिल्हापुरवठा अधिकारी यांनी ८ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा दुकाने सुरु केलीत व आदेशात उच्च न्यायालयाच्या अधीन राहून दुकाने पुर्वरत सुरु केलीत असे स्पष्ट नमूद केले होते . जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाला आवाहन देत तक्रारदार पंकज उर्फ शामकांत पाटील यांनी डिसेंबर २०२२ मध्येच पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत केस दाखल केली . उच्च न्यायालयाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देत पुढील आदेश होई पावेतो दुकाने पुन्हा रद्द केलीत.२५ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दहिवद येथील दोन्ही दुकाने नजीकच्या दुकानांना जोडण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी दहिवद येथे तात्पुरता जोडलेली असता निलंबित झालेली दुकाने सोनखेडी ,निमझरी ,कंडारी ,दहिवद खु.व गंगापुरी यासर्व दुकानांना दुकाने जोडण्यात येवू नयेत असे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.
तक्रारदार यांच्या बाजूने उच्च न्यायलयात बी.आर.वर्मा हे वकील होते तर दुकानदार यांच्याकडून वाय.एच.जाधव यांनी कामकाज पाहिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा