Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी यांनी शिरपूर राहुल भोई खून प्रकरणी राज्यपालांना पत्र चौकशीची मागणी...!
विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी यांनी शिरपूर राहुल भोई खून प्रकरणी राज्यपालांना पत्र चौकशीची मागणी...!
शिरपूर जिल्हा धुळे येथील भोई समाजातील कै.राहुल भोई या युवकाची दि.०४/०२/२०२३ रोजी धारदार शास्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारणी महाराष्ट्राचे राज्यपाल मा रमेश बैस यांनी लक्ष घालण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी यांनी केली आहे. तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अद्याप स्थानिक पोलिसांनी चार्जशीट देखील दाखल केली नसल्याचे व मागासवर्गीय समाजाच्या तरुणाची झालेली हत्या लक्षात घेता या प्रकारणी खटला Fast Track कोर्टात चालवावा तसेच दोषीना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदणाद्वारे केली. या विषयी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील असे महामाहीम राज्यपाल यांनी आश्वासित केले आहे.
दूस-या निवेदनात विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल मा रमेश बैस यांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, तळोदा, नंदुरबार यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय मुलींचे वसतिगृह,तळोदा येथील प्रवेशित आदिवासी विद्यार्थिनी कु.श्रमिका दयानंद चव्हाण हिच्या वडिलांनी प्रकल्प अधिकारी हे वाईट हेतूने वसतिगृहातील विद्यार्थिनींना त्रास देत असले बाबत दिलेली तक्रार महामहीम राज्यपाल यांना एका निवेदणाद्वारे निदर्शनास आणून दिली. यावर योग्य ती कार्यवाही तात्काळ केली जाईल असे आश्वासन महामहीम राज्यपाल यांनी दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा